Download App

राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?

  • Written By: Last Updated:

चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर आलेले दिसून आले. एकीकडे भाषणासाठी उभे राहिलेले राहुल गांधी जीव तोडून मोदींनी घेतलेले निर्णय, बेरोजगारी, महागाई, कर्ज आदी विषयांवर भाष्य करत होते. पण मंचावर बसलेल्या पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळचं गणितं फिरत असल्याचे दिसून आले. पवारांचे भाषण ज्यावेळी सुरू होते त्यावेळी राहुल गांधींनी पवारांचा शब्द न शब्द ऐकला. मात्र, राहुल गांधींच्या भाषणावेळी पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होते हे नक्की. त्यामुळे पवार आता काय नवीन डाव टाकणार? की भाकरी फिरवणारं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Rahul Gandhi Sharad Pawar In One Platform In Chandwad)

Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

पवार भाकरी फिरवण्याची चर्चा

भाजपनं लोकसभेसाठी आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यात अनेकांना नव्याने संधी देण्यात आली आहे, तर अनेक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र, दोन याद्या जाहीर होऊनही अद्यपपर्यंत महाविकास आघाडीत जागा वाटपांवरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे मविआच्या उमेदवारांची यादी कधी फायन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

चांदडवडच्या मंचावर राहुल गांधी मोदींच्या अपयशाचा पाढा वाचत असताना मागे बसलेले पवार सातत्याने मोबाईलमध्ये काहीतरी बघत होते. एकदा त्यांनी फोनवरही भाष्य केले. त्यामुळे एकाच मंचावर असतानादेखील पवार पडद्यामागे नेमके कुणाशी संपर्कात होते याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पवार पुन्हा भाकरी फिरवणार की, विजयासाठी खास डाव टाकणार? हे येत्या काही दिवसात समोर येईल.

“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

ठाकरे-काँग्रेसच्या चर्चांमध्ये पवारांची कोंडी

आतापर्यंतच्या मविआच्या अनेक बैठका पार पडल्या मात्र 10 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाचं एकमत झालेले नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या जागांवरूनही भिजत घोंगडं आहे. या सर्वांमध्ये शरद पवार गटाची कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पवारांच्या डोक्यात नेमकी काय गणितं सुरू आहेत याचा अंदाज अद्यापपर्यंत कुणालाही आलेला नाही.

पवारांचा कानात संवाद अन् पटोले ताडकन उठले

पवार मंचावर असताना मोबाईवरून सातत्याने कुणाच्यातरी संपर्कात होते. तर अधून मधून ते नाना पटोले यांच्या कानातही काहीतरी चर्चा करतना दिसले. या दोघांमधील संवादानंतर नाना पटोले त्यांच्या जागेवरून उठून जाताना दिसले. त्यामुळे पवारांनी पटोलेंच्या कानात नेमका काय निरोप दिला आणि तो ऐकल्यानंतर पटोले एकदम जागेवरून का उठले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी बाजी का मारली? जाणून घ्या पाच कारणे…

जागा वाटपांवरून पवार गांधींमध्ये खलबतं

राहुल गांधींचे भाषण सुरू असताना पवार जरी मोबाईलमध्ये व्यस्त असलेले दिसले तरी, सभेनंतर राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुमारे सात ते आठ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह जागावाटपाच्या फॉर्मुलावर दीर्घ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच आज किंवा उद्या मविआच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

follow us

वेब स्टोरीज