यवतमाळच्या ‘त्या’ घटनेनंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, शरद पवारांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

यवतमाळच्या ‘त्या’ घटनेनंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, शरद पवारांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Sharad Pawar Criticized Modi Government : ‘मला आठवतं, एकदा यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या कुटुंबाला भेटलो. मी शेतकऱ्याच्या पत्नीला विचारलं, तुझ्या मालकानं आत्महत्या का केली? तिनं सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराचं कर्ज होतं. पण बँकेने नोटीस पाठवली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ऐकून धक्का बसला. तडक दिल्लीत गेलो, मनमोहन सिंह यांना भेटलो आणि ठरवलं की शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं माफ करून टाकायचं आणि 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं.’ मनमोहन सिंह सरकारच्या काळात शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली यामागे ही हृदयद्रावक घटना आहे. हा प्रसंग खुद्द शरद पवार यांनीच आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात कथन केला.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले, मोठमोठ्या कारखानदारांना, उद्योगपतींना बँक कोट्यावधींची सवलत देते पण शेतकऱ्यांना सवलत देत नाही. पण आम्ही 70 हजार कोटी रुपयांचं कर्ज एकाच निर्णयात माफ करून टाकलं आणि शेतकऱ्यांवरील ओझं कमी केलं. पण, आज काय स्थिती आहे. आज शेतकरी संकटात आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारला आस्था नाही. म्हणून कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार मोदी सरकार हटवणं हे तुमचं आणि माझं काम आहे.

निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अजितदादांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर

आज देशात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल काहीच आस्था नाही. या सगळ्याचा परिणाम आज देशातील शेतकरी संकटात आहे. कर्जबाजारी झालाय. आत्महत्या करतोय परंतु, सरकारला याचं काहीच वाटत नाही. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी संकटात आला आहे.

आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. देशात सध्या महागाई आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना यांच्याविषयी काळजी नाही. शेतकरी संकटात असताना मोदी सरकारला त्याची काहीच फिकीर नाही. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा शब्दांत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

शरद पवार गटात प्रवेशाच्या अफवा पण लंकेंच्या चेहऱ्यावर भलतंच टेन्शन!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube