Download App

दौंडमधून शरद पवारांचा नवा भिडू मैदानात, डॉ.भरत खळदकर यांना विधानसभेसाठी संधी?

Bharat Khaldkar :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष

  • Written By: Last Updated:

Bharat Khaldkar :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीप्रमाणे शरद पवार (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीसाठी कोणता निर्णय घेणार आणि कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार याबाबत देखील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार शरद पवार मोठा निर्णय घेत दौंड विधानसभा मतदारसंघात डॉ.भरत खळदकर (Bharat Khaldkar) यांना उमेदवारी जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती शेजारी असणाऱ्या दौंड भागात शरद पवारांचं विशेष लक्ष असतं त्याला कारण ही तसंच आहे. सुभाष कुल यांच्या नेतृत्वाखालील अकरा आमदारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. सुभाष कुल यांनी शरद पवारांची पाठराखण केली होती.

शरद पवारांनी ही त्यावेळी सुभाष कुलांना साथ दिली. सुभाष कुल याच्यानंतर त्याचे पुत्र राहुल कुल राष्ट्रवादी बरोबर होते पण त्यांनी काही वर्षानी भाजप बरोबर हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले त्यामुळे दौंडची जागा महायुतीतून भाजपकडून राहुल कुल हेच सध्या उमेदवार असतील अशी शक्यता आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून (शरद पवार गट) रमेश आप्पा थोरात त्याच बरोबर डॉ.भरत खळदकर हे नाव देखील चर्चेत आहे. शरद पवार ऐनवेळी डॉ.खळदकरांना संधी देऊन भाजपा महायुती उमेदवाराचा टांगा पलटी करू शकतात अशी चर्चा सध्या दौंडमध्ये जोराने सुरु आहे.

खळदकर ह्यांचा जनसंपर्क जरी कमी असला तरीही त्यांचे सामाजिक कामाचा डोंगर मोठा आहे. मयुरेश्वर रुरल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक कामे त्यांनी उभा केलेली आहेत. केडगाव दौंड,शिरूर,बारामती,इंदापूर,पुरंदर परिसरात आरोग्य कॅम्प असतील किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब गरजू जनतेला मोफत उपचार असतील. वैद्यकीय सेवेबरोबर ग्रामीण भागातील युवक युवतीसाठी व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून वसुधा बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेकडून नर्सिंग स्कूल,फिजिओथेरपी,बी.एस.सी नर्सिंग कोसेर्स केडगाव येथे सुरू केले आहेत.

दौंड व इतर तालुक्यातील आरोग्य शिबीर असेल नांगाव व केडगाव परिसरात केलेली अनेक सामाजिक कामे असतील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण असेल वारकऱ्यांचे मोफत आरोग्य शिबीर असेल युवक, युवतींना रोजगारांच्या संधी असतील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य बरोबर इतर प्रश्नांची सोडवणूक असेल अशा अनेक सामाजिक गोष्टी डॉ.भरत खळदकर यांनी केल्या असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा असलेला प्रदीर्घ अनुभव,सामाजिक जाण व समजा प्रती असणाऱ्या तळमळीतून त्यांनी दौंड तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत.

‘माझी ताकद 100 पटीने वाढली…’, तिहारमधून बाहेर येताच भरपावसात केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल 

उच्च शिक्षित असणारे नेतृत्व,सामाजिक जाण,वैद्यकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.तसेच सुप्रिया ताई सुळे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.त्यामुळे यंदा दौंड मध्ये कुल आणि डॉ.खळदकर असा सामना पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

follow us