Download App

Sharad Pawar : आव्हाडांना दिल्लीत धाडणार; मविआच्या बैठकीचा पवारांनी सांगितला प्लॅन

Image Credit: Letsupp

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (9 जानेवारी) दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे बैठक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणारे असून त्यासाठी मी आव्हाड्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी पक्षाच्या हिताची भूमिका मांडावी.

नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला

तसेच पवार पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी मधील सर्व घटक पक्ष यांनी एकत्रित आगामी निवडणुकांना सामोरे जावे. यासाठी ही प्राथमिक बैठक असेल यापुढे आणखीही बैठक होतील. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते देखील आगामी बैठकांना उपस्थित राहतील. तर सध्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांची एकमेकांशी सुसंगत अशी भूमिका घेण्याची तयारी असल्याचे देखील पवारांनी सांगितलं. आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर किंग खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले…

तर जागा वाटपावर बोलतना पवार म्हणाले की, सध्या जागा कोणा कडे आहे? ती जागा कोणी लढवली तर कुणाला जास्त मत मिळाली या आधारावर जागा वाटप करताना विचार करावा. तसेच जास्त जागा मिळव्यात ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण चर्चेतून मार्ग निघेल. काँग्रेसकडे जास्त जागा आहेत. काँग्रेस जास्त जागा जिंकण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे महाराष्ट्रात ते 8 ते 9 जागावर लढण्याची चर्चा होऊ शकते. अशी माहिती शरद पवारांनी दिली. त्याचबरोबर यावेळी इंडिया आघाडीमध्ये वंचित घेण्याबाबत शरद पवार म्हणाले की, वंचितला सोबत घ्यावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

follow us

वेब स्टोरीज