सत्यपाल मलिक यांनी निवृत्तीनंतर जे काही सत्य सांगितलं. त्यामुळे आता स्पष्ट झालं आहे की सरकारला जवानांच्या जीवाचं काही पडलं नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहायचा अधिकार नाही, अशी टीका माजी कृषिमंत्री शरद पवार आज पुरंदरमध्ये बोलत होते. पुणे जिल्हातील पुरंदरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी सत्ताधारी भाजप पक्षांवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्येवरून देखील सरकारवर टीका केली. मागच्या आठवड्यात मी मध्यप्रदेश मध्ये गेलो होतो. मध्य प्रदेशमध्ये पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मी गेलो होतो. गेल्या काही दिवसात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात अवकाळी पाऊस पडला आहे.
Maharashtra Bhushan Award ceremony : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेड आक्रमक
त्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. परिणामी राज्य सरकारने त्यांना मदत करायला हवी होती, पण तसं घडलं नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या होत आहेत. जे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, त्या सरकारला सत्तेवर बसायचा अधिकार नाही. अशी टीका त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीच्या या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित राहणार होते. पण अजित पवार यांनी अचानक आपला पुणे दौरा रद्द केला आहे. या कार्क्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. पण अजित पवारांचा पुरंदर तालुक्याचा दौरा आज नियोजित होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास अन् मानकरी