मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former Commissioner of Mumbai Municipal Corporation) आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे (Yashwantrao Chavan Centre) विश्वस्त आणि शरद पवार (Sharad Pawar)यांचे सहकारी शरद काळे निधन झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post)लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त तथा शरद पवार यांचे सहकारी, आमचे मार्गदर्शक शरद काळे यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. काळे सरांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अतिशय भरीव असे काम केले. चव्हाण सेंटरच्या जडणघडणीत त्यांचे अतिशय महत्त्वाचे असे योगदान आहे. ते अतिशय कुशल असे प्रशासक होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडल्या.
Sambhajinagar Violence : राज्यपालांनी दिले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आदेश!
त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी 1962 साली पुणे येथून गणित विषयात सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर ते 1963 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. यानंतर 1972 साली हवाई विद्यापिठातून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली. राज्य व भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले होते.
निवृत्तीनंतर त्यांनी 1998 पासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कामकाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण सेंटरने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडले. शरद काळे सरांचे निधन ही आम्हा सर्वांची वैयक्तिक हाणी आहे, जी कधीही भरुन येणार नाही. त्यांची उणीव आम्हा सर्वांना कायम जाणवत राहील. या कठिणप्रसंगी आम्ही सर्वजण काळे कुटुंबियांच्या सोबत आहोत. सरांच्या पार्थिवावर रविवारी (दि.2) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा आशयाची पोस्ट लिहून खासदार सुप्रिया सुळेंनी श्रद्धांजली वाहिली आहे.