Laxman Hake : आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही भेट आरक्षणाच्या मुद्यावर होती अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी दिली तर आता या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाबद्दल (OBC Reservation) ठाम भूमिका घेतली आहे पण शरद पवार ज्यांना जनतेचा राजा म्हटलं जातो, ज्यांना पुरोगामी नेता म्हणून ओळखला जातो मात्र आज पुरोगामी ओळख जपताना शरद पवार दिसत नाही असा माझा एक कार्यकर्ता म्हणून आरोप आहे.
आज राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे मात्र शरद पवार यांच्या तोंडातून ब्र शब्द देखील निघत नाही. कधीकाळी शरद पवार हे 18 पगड जातींना एकत्रित घेऊन महाराष्ट्राचा नेतृत्व करायचे मात्र आज शरद पवार का? बोलत नाही असा प्रश्न राज्यतील ओबीसींना पडला आहे.
आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपला पुरोगामी महाराष्ट्र कुठे आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे आहे? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना विचारला असेल आणि आरक्षण प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असेल असं यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले.
तसेच लोकप्रतिनिधी देखील आता जातीवाद करत आहे. मराठवाड्यातील 9 खासदारांनी मनोज जरांगे यांना लेखी पत्र लिहून दिलं. मात्र ओबीसींच्या प्रश्नावर एक खासदार देखील बोलायला तयार नाही असा आरोप देखील माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच लोकप्रतिनिधींकडून जरांगे यांच्या रॅलीसाठी पैसे आणि गाड्या पुरवण्याचे होत असल्याचा आरोप देखील यावेळी हाके यांनी केला.
आम्ही एक ते दीड तास चर्चा केली : छगन भुजबळ
मी शरद पवारांच्या भेटीला गेलो तेव्हा पवार साहेब झोपलेले होते. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आराम करत होते. त्यानंतर एकदीड तासाने आमची भेट झाली. त्यामध्ये आम्ही एक ते दीड तास चर्चा केली. दरम्यान, मी पवार साहेबांना सांगितलं मी मंत्री म्हणून, राजकारणी म्हणून किंवा राजकीय मुद्दा घेऊन आलो नाही. तुम्ही ओबीसींना आरक्षण दिलं. परंतु, आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली ती कठीण आहे.
ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक, 35 लाखांचे कोकेन जप्त
कुणी कुणाच्या दुकानात जात नाही अशी परिस्थिती आहे. त्यावर आपण राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून यावर तोडगा काढला पाहिजे अशी विनंती आपण शरद पवारांना केली अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते शरद पवारांच्या भेटीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.