Download App

जिथं भाजपची सत्ता, तिथंच दंगली, शरद पवारांचा घणाघात…

Sharad Pawar Speak on Riots : ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता तिथंच दंगली होत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला आहे. काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलंय.(Sharad Pawar’s Statement on Riots Where there is BJP power, there are riots)

Prajakta Mali: ‘जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूत’; प्राजक्ताची समीर चौघुलेसाठी खास पोस्ट

शरद पवार म्हणाले, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. तेव्हापासून राज्यातील अनेक भागांत दंगलीच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगरमधील संगमनेर, कोल्हापुर, नांदेड, अकोला, जळगावमधील अंमळनेरमध्ये दंगली घडल्या आहेत. कोल्हापुर हे शाहु महाराजांचं गाव, तरीही मागील काही दिवसांत जाती धर्माच्या नावावर दंगली घडवण्याचं काम सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

ODI World Cup 2023: वर्ल्डकपमुळे बॉलीवूडला बसणार जबर फटका ! पाहा कोणते आहे ते सिनेमा?

तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम सुरु आहे. तर दुसरीकडे मणिपूर राज्यातही हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार अद्याप थांबलेला नसून गेल्या 45 दिवस हा हिंसाचार सुरु आहे. त्यामुळे देशात ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्याचं राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली घडत असल्याचं पवार म्हणालेत.

विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अहमदनगरमधील मुकूंदनगर भागात संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आले होते. त्यानंतर संगमनेरमध्येही दोन गटांत तुफान दगडफेकीची घटना घडली.

भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात

एवढंच नाहीतर या प्रकरणाचे पडसाद हळूहळू राज्यभरात उमटायला सुरुवात झाली होती. कोल्हापुरात एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी कोल्हापुरातही दंगल झाल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, राज्यात घडत असलेल्या दंगलीच्या घटनांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून अशा घटना घडू नये, म्हणून उपाययोजना कराव्यात अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.

Tags

follow us