Download App

शेअर मार्केट घोटाळा! शेवगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

Stock Market Scam : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवून गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार

  • Written By: Last Updated:

Stock Market Scam : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवून गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून शेवगाव (Shevgaon) तालुक्यात सुरू होता. मात्र आता या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgaon Police Station) पहिला गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शहरात खुलेआम शेअर मार्केटचे दुकान खोलून बसणाऱ्या या ट्रेडर विरोधात आता पोलिसांनी आक्रमक पावले उचलल्याने इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहीजण तर विदेशी फरार झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

प्रकरण काय

गेल्या काही दिवसांपासून शेवगाव तालुक्यात ट्रेडर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोष परतावा मिळवा असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यावधींची गुंतवणूक करू घेत होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी अशी शेअर मार्केटच्या नावाखाली दुकाने सुरू झाली होती. दहा टक्के, बारा टक्के असे परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराकडून मोठमोठाल्या रकमा स्वीकारला जात होते.

गुंतवणूकदारांना सुरुवातीला या ट्रेडरकडून नियमित महिन्याला परतावा मिळत होतो. मात्र त्यानंतर बंद झाले. काही ना काही कारण सांगून ट्रेडर वेळ काढुपणा करत होत आणि त्यानंतर कोट्यावधींची गुंतवणूक घेऊन ही ट्रेडर फरार झाले. त्यानंतर अखेर नागरिक समोर येऊन संबंधित ट्रेडरबाबत आता गुन्हे दाखल करू लागले आहे.

यातच शेवगाव तालुक्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे (राहणार गदेवाडी तालुका शेवगाव) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray : मनसेमध्ये ठाकरेंचं ‘राज’! पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड

यामध्ये शेअर मार्केटची ट्रेडिंग करणाऱ्या अक्षय इंगळे, अविनाश इंगळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी गावच्या आसपास गावातील 26 लोकांची तब्बल 83 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे.

follow us

वेब स्टोरीज