महाराष्ट्रातच सर्वाधिक परकीय गुंतवणूक, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

  • Written By: Published:
महाराष्ट्रातच सर्वाधिक परकीय गुंतवणूक, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

foreign investment in maharashtra : महाराष्ट्रातील कंपन्या गुजरात व इतर राज्यांमध्ये जात असल्याच्या कारणावरून विरोधक हे सत्ताधारी यांना घेरतात. पुण्यातील हिंजवडी येथील काही आयटी कंपन्या या पायाभूत सुविधा अभावी स्थलांतर करत आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परदेशी गुंतवणुकीची आकडा ट्वीट करून ( Foreign Direct investment) विरोधकांचा समाचार घेतला आहे. (Highest foreign investment in Maharashtra, Gujarat second; Fadnavis)


अग्रवाल पिता-पुत्रास दिलासा? दोघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी थेट परकीय गुंतवणुकीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे. तर 2023-2024 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत सुमारे सात हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार 101 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; 288 मतदारसंघात देणार उमेदवार, राजकीय पक्षांना घाम फोडणार

या आर्थिक वर्षात गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षा अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात गुजरातमध्ये 60 हजार 600 कोटींची परदेशी गुंतवणूक आली आहे. तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकमध्ये 54 हजार 427 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.


बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते…

महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आला आहे. बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज