Download App

‘ठाकरे गटाचं अस्तित्व संपलं अन् राऊत पवारांची स्क्रिप्ट वाचतात’; शिंदे गटाच्या आमदाराने धू-धू धुतलं…

Sanjay Shirsat : मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट समोर उभा ठाकलेला आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर(Sanjay Raut) बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांनी(Sanjay Shirsat) खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाचं अस्तित्व तर संपलचं, पण संजय राऊत शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत.

Independence Day : 400 सरपंच, 250 शेतकरी अन् मच्छिमार.., स्वातंत्र्य उत्सवात लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे असणार

पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. जे लोकं आमच्या विरोधात बोलताहेत, गद्दार म्हणताहेत तेच आमच्या दारात उभं राहणार असल्याचं शिरसाठ म्हणाले आहेत. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येणार असल्याने विरोधकांना चिंता लागली असल्याचं म्हणत त्यांनी चिमटा काढला आहे.

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

यावेळी बोलताना शिरसाठ यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्टच्या आधारे बोलत असतात. संजय राऊत उगीचच बोलत नाहीत, त्यांना शरद पवारांनी स्क्रिप्ट दिलेली आहे, त्यामुळेच ते बोलत असल्याचं म्हणत त्यांनी राऊतांना डिवचलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत, आता उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व संपलं असल्याचीही टीका त्यांनी केलीयं.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार राजीनाम्यासाठी तयार असतील तर ते उद्धव ठाकरे गटाला भारी पडतील, तसं काही असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची दखल घेतली पण काहीही झालं तरीही आम्ही उद्धव ठाकरे गटासोबत जाणार नसल्याचं आमदारांनी ठामपणे सांगितल्याचं शिरसाठ यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us