महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली.
काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. आज शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आता शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज कौल युक्तिवाद करत आहेत.
हेही वाचा : शिंदे विरुद्ध ठाकरे : शिंदे गटाकडून साळवे यांनी काय युक्तिवाद केला?
सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली.
ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी बोलावलं होतं. मात्र बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंनी राजीनामा दिला
ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला फक्त १४ आमदार होते
एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. याउलट अजय चौंधरीची निवड ही बेकायदेशीर आहे.
भाजप आणि शिंदे गटाकडे पूर्ण बहुमत आहे
नबाम राबिया केस महाराष्ट्राच्या सत्तांतर केसला लागू होते
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अधिकार नसताना पदावर राहिले