Live Blog | शिंदे विरुद्ध ठाकरे : आजचा युक्तिवाद संपला, उद्या पुन्हा सुनावणी होणार

  • Written By: Published:
Live Blog |  शिंदे विरुद्ध ठाकरे : आजचा युक्तिवाद संपला, उद्या पुन्हा सुनावणी होणार

महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली.

काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. आज शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत.

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Feb 2023 03:51 PM (IST)

    सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले

    राज्यपालांनी राजकीय मत व्यक्त करू नये.

    सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले

  • 15 Feb 2023 03:49 PM (IST)

    राज्यपाल हा युक्तिवाद कसा मांडू शकतात ?

    शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची आघाडीही निवडणूकीनंतर झालेली आहे.

    त्यावर सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले

    राज्यपालांनी या मुद्दयांवर बोलू नये, सरन्यायाधीशांनी खडसावले

  • 15 Feb 2023 03:40 PM (IST)

    तुषार मेहता बाजू मांडत आहे

    सॉलीसिटीर जनरल तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत

  • 15 Feb 2023 03:16 PM (IST)

    कोर्टाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित

    कोर्टाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

    न्यायमूर्तींना काही चर्चा करण्यासाठी निर्णय

  • 15 Feb 2023 03:08 PM (IST)

    नवाब राबिया प्रकरणाची प्रक्रिया लक्षात घ्या

    नवाब राबिया प्रकरणाची प्रक्रिया लक्षात घ्या. नीरज कौल यांचा युक्तिवाद

  • 15 Feb 2023 03:07 PM (IST)

    प्रकरण मोठ्या बेंचकडे जाणार ?

    प्रकरण मोठ्या बेंचकडे देण्याची गरज आहे का ? असा प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला आहे.

  • 15 Feb 2023 02:48 PM (IST)

    अविश्वास प्रस्तावानंतर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही - कौल

    ब्रेकनंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादाला सुरूवात

    अविश्वास प्रस्तावानंतर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही - कौल यांचा युक्तिवाद

  • 15 Feb 2023 01:22 PM (IST)

    प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची गरज नाही

    ठाकरे गटाकडून प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची मागणी केली होती.

    हे प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची गरज नाही. ५ बेंच जजेसकडेच सुनावणी व्हावी.

    शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा दावा

  • 15 Feb 2023 01:09 PM (IST)

    नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं - सर्वोच्च न्यायालय

    ठाकरे शिंदे वादाच्या सुरुवातीपासून नबाम रेबिया केसचा उल्लेख केला जात आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे.

    नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं, अशी टीप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube