Bakrid Eid on Durgadi Fort : आज बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याण येथली दुर्गाडी किल्ला या भागात (Eid ) असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. (Shiv Sena) यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याबाहेर घंटानाद आंदोलन केलं. (Bakrid Eid) तसंच, आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नसून जोपर्यंत प्रवेश देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अयोध्येचा अध्याय बदलला; राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास NCERT वर संतापले
कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बकरी ईदच्या दिवशी बंदी घातली जाते. मात्र, 90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं. आज पुन्हा एकदा या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
काही काळासाठी बंद
दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे. तसंच, त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचं दर्शन आणि पूजा ही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध आनंद दिघेंनी सुरु केला होता. त्यांनी या विरोधात घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत.
काय म्हणणं आहे आंदोलकाचं ? पुढील 48 तास या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी
बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचं दर्शन घेतलं होतं. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे. असं आंदोलकांनी म्हटलं आहे.