Download App

MLA Disqualification Case : शिंदेंचे बंड ते अपात्रतेची धाकधूक; 569 दिवसातील प्रत्येक घडामोड

  • Written By: Last Updated:

MLA Disqualification Case : जून 2022 पासून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरू केलेलं बंड नाट्य अखेर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या बंडानंतर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज (दि. 10) निकाल देणार आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आमदार अपात्र प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याची मुदत दिली होती. (What Happened After Eknath Shinde Rebell In Maharashtra Politics)

गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की..,; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

20 जूनला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सुरतला गेले तिथून पुढे सत्तास्थापना आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपर्यंच्या कालावधीसंदर्भातील उलट-सुलट प्रश्नांनीच सुनावणी गाजली. एकानाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाकडून अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते.

शिंदेच्या बंडानंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाने एकमेकांविरोधातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकूण 34 याचिका दाखल केल्या होत्या. गेल्या दीड वर्षांमध्ये मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि परत मुंबई अशा प्रवासानंतर झालेलं सत्तांतर आणि त्याला दिलेलं आव्हान सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि शेवटी विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलं होतं. संपूर्ण सुनावणी दरम्यान 20 जून 2022 ते 4 जुलै 2022 पर्यंतचा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. त्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचे कौल दिला होता.

MLA Disqualification : आमदार पात्र की अपात्र? ठाकरे अन् शिंदेंसाठी आजचा दिवस महत्वाचा

20 जून 2022 एकनाथ शिंदें झाले नॉटरिचेबल

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला 20 जून 2022 च्या रात्रीपासून सुरूवा झाली. या दिवशी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली होती. या दिवशी रात्री शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल झाले. त्यानंतर शिंदे आणि समर्थक आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला रवाना झाले.

23 जून 2022

शिंदेंनी 20 जून रोजी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जून 2022 रोजी शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाईचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे देण्यात आले होते. एकनाथ शिंदेंच्या 16 समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे, अशी मागणी देणारं पत्र उद्धव ठाकरे गटाकडून (तेव्हाची शिवसेना) करण्यात आली होती.
विधानसभा उपाध्यक्ष असलेले तत्कालीन नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यात आलेल्या या पत्रात 22 जून रोजी पक्षाने बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून शिस्तभंग केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या शिस्तभंग प्रकरणी एकनाथ शिंदे, संदिपान भुमरे, भरत गोगावले यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिलं होतं.

24 जून 2022

शिंदे समर्थक बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरु झाल्या. तर तिकडे गुवाहाटीला शिवसेना विधिमंडळ पक्षातले बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करत आवश्यक संख्याबळ पूर्ण झाल्याचे शिंदेंकडून सांगण्यात आले. या दाव्यानंतर शिंदेंना धक्का देत तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

Devendra Fadnavis : ‘सरकार कालही स्थिर होते, उद्याही राहिल’; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

25 जून 2022

या सर्व राजकीय बंडात 25 जून रोजी झिरवळ यांनी शिंदेंसोबत गेलेल्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. तसेच बाजू मांडण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला. बाजू न मांडल्यास या सर्वांना अपात्र ठरवले जाईल असा उल्लेखही झिरवळ यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये करण्यात आले होते. याच दरम्यान, पार पडलेल्या शिवसेवेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणत्याही पक्षाला वा गटाला वापरता येणार नाही यासह सहा प्रमुख ठराव मंजूर करत शिंदेंना कात्रीत पकडण्यात आले.

26 जून 2022

शिवसेनेकडून 16 आमदारांना पाठववण्यात आलेल्या अपात्रतेची नोटीस आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याशिवाय झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर निर्णय होईपर्यंत झिरवण यांना आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाकडून दाखल करण्यात आली.

30 जून 2022

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला. शिवसेना आमदार गोव्यातून परत येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असा अंदाज होता. मात्र, ऐन शपथविधीच्या आदल्या दिवशी शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करण्यात आले. यावेळी नाराज फडणवीसांनी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. मात्र, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांचा आदेश येताच फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले.

Sharad Pawar : नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा; पवारांनी व्यक्त केली चिंता

1 जुलै 2022 

विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपा शिंदे गटासाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याच आली. महाआघाडी सरकारच्या काळात अध्यक्षपदाची निवडणूक नाकारणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्तांतर होताच निवडणूक लावली. यावर प्रचंड टीका झाली.

2 जुलै 2022

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी परस्पर व्हिप काढण्यात आले. उद्धव ठाकरे गटाकडून राजन साळवी हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे राहिले. राजन साळवींना मतदान करा असा व्हिप प्रतोद सुनील प्रभू यांनी काढला. गटनेतेपदी अजय चौधरी यांना करण्यात आले. तर शिंदे गटाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.

3 जुलै 2022

नवीन विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर विजयी झाले. उपाधक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. यावेळी गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रतोद पदी भारत गोगावले यांची निवड झाली.

4 जुलै 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव 164 विरुद्ध 99 मतानी जिंकला. अजित पवार विरोधी पक्ष नेते झाले.

7 जुलै 2022

39 आमदार अपात्रेबाबत उपाध्यक्षांनी निर्णय घ्यावा यासाठी उद्वव बाळासाहेब ठाकरे गट सर्वोच्च नयालयात गेला.

नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला

11 जुलै 2022

आमदार अपात्रेबाबत 12 जुलैला विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होईपर्यंत अध्यक्षांनी कुठलाही निर्णय घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यात एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला.

20 जुलै 2022

शिवसेना फुटीबाबत घटनात्मक पेच निर्माण झाल्याने ही सुनावणी व्यापक घटनापीठाकडे देण्याचे संकेत मुख्य न्यायमूर्ती रामन्ना यांनी दिले.

4 ऑगस्ट 2022

मूळ शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय येत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नका असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला दिले.

23 ऑगस्ट 2022

शिवसेनेबाबत सुनावणी घटनापीठाकडे देण्याचा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ तयार करण्यात आले. त्याचवेळी अंधेरीची पोट निवडणूक लागली. त्यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास सर्वोच्च नयायालयाने परवानगी दिली. चिन्ह आणि पक्ष वाद सुरु असताना अंधेरी पोटनिवडणूक लागली.

ठाकरेंना मशाल तर, शिंदेंना ढाल चिन्ह

अंधेरी पोटनिवडणूक कोणत्या चिन्हावर लढवावी यासाठी निवडणूक आयोगाने चिन्हाचे वाटप केले. यात उद्वव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल तर, एकनाथ शिंदेंच्या गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आले. 3 नोव्हेंबर 2022 ला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके मशाल चिन्हावर विजयी झाल्या.

Disqualification MLA : अरं बाबा…त्याचा माझा काय संबंध; नरहरी झिरवळांनी अंगच झटकलं

डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023

शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगामध्ये दोन्ही पक्षांच्या सुनावणीला सुरूवात झाली. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगाने धनुष्याबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. तसेच मूळ शिवसेना पक्षदेखील शिंदेंना दिला. 14 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. यात राज्यपालांना खडेबोल सुनावण्यात आले. 16 आमदारांची भूमिका अयोग्य. शिंदेंचा व्हिप चुकीचा असला तरी, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता, असे सांगत हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.

Disqualification MLA : निकालाआधीच राहुल नार्वेकर CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

मे 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान या प्रकरणावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर जुलै 2023 मध्ये विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याबरोबर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. ऑक्टोबर 2023 मध्ये ठाकरे गट अध्यक्ष कोणताही निर्णय घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर 14 सप्टेंबर 2023 ला सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रेबाबत 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यानच्या काळात 20 डिसेंबरपर्यंत दोन्ही पक्षांची बाजू आणि उलट तपासणी नार्वेकरांनी ऐकली. त्यानंतर निकालाबाबतची वेळ 21 जानेवारी 2024 पर्यंत वाढवून देण्याची विनंती नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयात केली. मात्र, ही विनंती नाकारत न्यायालयाने आमदार अपात्रेतेचा निर्णय 10 जानेवारी 2024 पर्यंत देण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीवर 6 हजार पानांचे निकालपत्र तयार असल्याची माहिती आहे.

शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खरा व्हिप कोणाचा याबाबत दोन्ही गटाने व्हिप काढले होते. भारत गोगावले यांनी 56 आमदारांसाठी व्हिप काढला होता. तो व्हिप उद्धव ठाकरे गटाच्या 16 आमदारांनी मान्य केला नाही. ते आमदार असे.

अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार कोणते?

शिवसेना शिंदे गट 16 आमदार

1) एकनाथ शिंदे 2) चिमणराव पाटील 3) अब्दुल सत्तार 4) तानाजी सावंत 5) यामिनी जाधव 6) संदीपान भुमरे  7) भरत गोगावले 8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे 10) प्रकाश सुर्वे 11) बालाजी किणीकर 12) बालाजी कल्याणकर 13) अनिल बाबर 14) संजय रायमूळकर 15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी 2) रवींद्र वायकर 3)राजन साळवी 4) आदित्य ठाकरे 5) वैभव नाईक 6) नितीन देशमुख 7) सुनील राऊत 8) सुनील प्रभू 9) भास्कर जाधव 10) उदयसिंग राजपूत 11) प्रकाश फातर्फेकर 12) संजय पोतनीस 13) रमेश कोरगावकर 14) कैलास पाटील15) राहुल पाटील

follow us