Mithi Scam : मिठी नदी गाळ उपसा करण्याच्या प्रकरणात खोटे दस्तऐवज सादर करून केलेल्या फसवणुकीप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय प्रसिद्ध अभिनेता दिनो मोरिया (Dino Morea) याची चौकशी झाली. हाच धागा पकडत शिवसेनेने (Shivsena) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , आदित्य ठाकरे आणि त्यांचा मित्र दिनो मोरिया यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिठी नदीत (Mithi River) झालेल्या गाळ उपसा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे व्यंगचित्राआडून आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर शिवसेनेकडून बोट ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकरणी खोटे दस्तावेज सादर करून महापालिकेची 65 कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले. यात अटक असलेल्या आरोपींनी दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँतिनो मोरियाचे नाव आणि त्यांच्यातील संभाषणाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिनो मोरियाची चौकशी करून त्याला सोडले. यावरच, नेमका निशाणा साधत शिवसेनेने व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात ‘मी-बाबा-दिनो, खाऐंगे तीनो’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांची व्यंगचित्रे काढण्यात आली आहेत.
शेतजमिनीचं काम अन् 5 लाखांची लाच; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात
तसेच, मिठी नदीतील गाळाऐवजी महापालिकेला फसवून पैसे काढले जात असल्याचे व्यंगात्मक रितीने दाखवले गेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे व्यंगचित्र व्हायरल झाले असून अनेक जण याप्रकरणी उबाठा गटावर टीकाही करताना दिसत आहेत.