Shivam Chikane Died After Beaten Up Love Affair : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला (Love Affair Incident) आहे. अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शिवम चिकणे (वय 21) या तरुणाला प्रेयसीने घरी बोलावलं असताना, अचानक तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. त्यानंतर वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमला गावातील रस्त्यावर थांबवून (Beed) लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली. पोलीस तपासात खूनाचा गुन्हा दाखल (Crime News) करण्याची तयारी सुरू आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर (Beed Crime) आल्या आहेत. प्रेमसंबंधातून झालेली हत्या, किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, तर दुसरीकडे आत्मदहनाचा प्रयत्न (Beed News) केल्यास बंदोबस्ताचा खर्च वसूल करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्णय, अशा तिहेरी घडामोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रेमसंबंधातून अभियंता तरुणाचा मृत्यू
गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे शिवम काशिनाथ चिकणे (वय 21) या अभियंत्रिकी शिकणाऱ्या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. शिवमचा गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होता. पीडित तरुण त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर नातेवाईक अचानक तेथे आले. वादाची तीव्रता इतकी वाढली की, काही वेळातच शिवमला रस्त्यात थांबवून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली.
चीनचं धरण भारताला टेन्शन! चीनी पंतप्रधानांची घोषणा अन् कामाला सुरुवात; भारताच्या कोंडीचा प्लॅन?
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवमला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तलवाडा पोलिसांनी दिली आहे. लवकरच या प्रकरणात खूनाचा कलम लावण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण
बीडमधीलच अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात आणखी एक खळबळजनक घटना घडली. अवघ्या किरकोळ वादातून अविनाश सगट या तरुणाला दोन दिवसांपर्यंत डांबून ठेवत बांबू, लाकडी दांडे आणि लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली होती. जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. इतर आरोपींचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.
रस्त्यावरची लढाई कोर्टात! हिंदी भाषिकांना मारहाणप्रकरणी ठाकरेंविरुद्ध ‘सुप्रीम’मध्ये याचिका
आत्मदहनाच्या धमकीबाबत कडक निर्णय
दरम्यान मागण्या मान्य न झाल्यामुळे अनेक आंदोलक आत्मदहन किंवा विष प्राशनाच्या धमक्या देऊन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस बंदोबस्तासाठी ज्या व्यक्तीमुळे यंत्रणा तैनात करावी लागते, त्या व्यक्तीकडूनच आता संबंधित खर्च वसूल केला जाणार आहे. नुकताच अशाच एका प्रकरणात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला साडे तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी म्हटलंय की, अशा प्रकारे आंदोलन करण्यामुळे मनुष्यबळ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांचा गैरवापर होतो. या कृतीमुळे शासकीय यंत्रणेला आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.