चीनचं धरण भारताला टेन्शन! चीनी पंतप्रधानांची घोषणा अन् कामाला सुरुवात; भारताच्या कोंडीचा प्लॅन?

China Dam Project : भारताच्या सीमेजवळ दक्षिण पूर्व तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एका मोठ्या धरणाच्या बांधकामाला चीनने सुरुवात केली आहे. डिसेंबर 2024 मध्येच या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. चीनच्या या खोडीने भारताची काळजी वाढली आहे. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम तिबेटमधील निंगची भागात झाला. हा परिसर भारतातील अरुणाचल प्रदेशच्या अगदी जवळ आहे त्यामुळे भारताला धोका वाढला आहे. कारण दुसऱ्या देशांना त्रास देणे, त्यांची नाकाबंदी करणे, धमकावून जमिनी बळकावणे असेच उद्योग चीन आजवर करत आला आहे.
चीनच्या या धरणाच्या कामावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर इशारा दिला होता. त्यांचे म्हणणे होते की हा प्रोजेक्ट भारताची सुरक्षा आणि अस्तित्वासाठी धोका ठरू शकतो. या प्रोजेक्टवर चीन तब्बल 167 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. यामध्ये पाच हायड्रोपावर स्टेशन तयार केले जाणार आहेत. याद्वारे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाणार आहे. यांग्त्जी नदीवर तयार करण्यात आलेल्या थ्री गॉर्जेस प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेपेक्षा ही वीज कितीतरी जास्त असेल.
अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! TRF दहशतवादी संघटना घोषित; पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी
भारताने चीनला बजावले
चीनने या प्रोजेक्टला तिबेटचा विकास आणि कार्बन न्यूट्रल करण्याच्या उद्दिष्टाशी जोडले आहे. सरकारी माध्यमांनुसार यामुळे तिबेटमधील विजेची मागणी पूर्ण करता येणार आहे. चीनचा हा डाव भारताच्या लक्षात आला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यातच भारत सरकारने या प्रोजेक्टबाबत चिंता व्यक्त केली होती. ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होणार नाही याची काळजी चीनने घ्यावी असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. यानंतर चीनने हा प्रोजेक्ट सुरक्षित असल्याचा दावा केला होता.
भारतावर काय परिणाम होणार
या धरणामुळे भारताच्या अरुणाचल प्रदेश, आसाम (Arunachal Pradesh) या राज्यांवर परिणाम होऊ शकतो. जर चीनने या धरणाच्या माध्यमातून नदीचे पाणी रोखले किंवा त्याचा प्रवाह बदलवला तर भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत पूर किंवा दुष्काळाची समस्या निर्माण होऊ शकते. ब्रह्मपुत्र ही नदी तिबेटमधून उगम पावते. भारत आणि नंतर बांग्लादेशात जाते. त्यामुळे चीनच्या या प्रोजेक्टचा परिणाम भारताप्रमाणेच बांग्लादेशवरही होणार आहे. मुख्यमंत्री खांडू म्हणाले की चीनने कोणत्याही जागतिक जल करारावर सही केलेली नाही. त्यामुळे चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे. चीन काय करेल याचा अंदाज कुणालाच येऊ शकत नाही अशी भीती अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी व्यक्त केली.
भारतात विकलं जाणार नॉनव्हेज दूध; अमेरिका अन् भारतातील डिल नेमकी काय?