प्रेमाचा त्रिकोण अन् भयंकर हत्याकांड; प्रियकर गुजरातहून आला थेट पुण्यात आला, तरूणाला भोसकलं…

Pune Crime News Minor Boy Murder In Dehu In Love Affair : पुण्यात पु्न्हा एक भयंकर हत्याकांड (Pune Crime) घडलंय. प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरूणाची हत्या प्रियकराने केली आहे. प्रियकर तरूणीला भेटायला थेट गुजराहून आला होता. त्याने तरूणीला भेटायला बोलवलं अन् मग भयंकर घडलं. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत हत्या झालेल्या (Minor Boy Murder) मुलाचा चुलत भाऊ देखील सामील असल्याचा खुलासा झालाय.
दिलीप मौर्या (वय 16) असं खून झालेल्या तरुणाचे नावे असून त्याचा अल्पवयीन चुलतभाऊ गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी आरोपी सनी सिंग (वय- 19) ला बेड्या ठोकल्या आहेत.
आपल्या मैत्रिणीसोबत दिलीपचे प्रेम प्रकरण सुरू (Love Affair) आहे, याचा राग सनी सिंगला राग होता. त्यावरून त्याने बुधवारी (11 जून) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दिलीपला थॉमस कॉलनीच्या मोकळ्या मैदानात बोलावून घेतले.
दिलीपच्या गळ्यावर चाकूने वार
यावेळी दिलीपने त्याच्या चुलत भावाला सोबत नेलं होतं होतं. तिथे गेल्यानंतर नी सिंग अन् दिलीपमध्ये प्रेमसंबंधांतून मोठा वाद झाला. यातच सनी सिंग याने दिलीपच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी त्याच्या चुलतभावावर देखील आरोपीने वार केला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दिलीपने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, आरोपी सनी सिंग हा एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे.
दिलीप आणि आरोपी सनी सिंग राजपूत यांचं एकाच अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं. परंतु मुलीने गेल्या तीन महिन्यांपासून सनीशी बोलणे बंद केलं होतं. ती दिलीपच्या संपर्कात होती.त्यामुळे संतापलेला आरोपी सनी सिंग राजपूत थेट गुजरातमधून देहूरोडला आला, तिथे त्याने दिलीपची हत्या केली. पोलिसांनी सापळा रचून शिताफिने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केलाय.
पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं
पुढील तपासात काय अपेक्षित आहे?
पोलीस तपास अजून सुरू असून, चाकू जप्ती व CCTV फूटेजच्या माध्यमातून घटनेची संपूर्ण पोलिस चौकशी आणि न्यायालयीन कारवाईस सुरुवात झाली आहे. नातेवाईकांच्या मागणीनुसार आरोपीला दिलीपच्या मृत्यू कारक तपासातील गुन्ह्यात (खून अंतर्गत) कारवाया केली जाईल. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यांचा दबाव वाढत आहे. यातून पंचायत समितीकडून बचाव नीती, सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थापन अन् संवेदनशील तपास यांवर उपाययोजना अपेक्षित आहे.