Sanjay Raut replies PM Modi : शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदींना प्रत्युत्तर देत आहेत. जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली.
Maratha Reservation : कुणबी दाखले प्रमाणपत्र समितीला सरकारने मुदवाढ का दिली? खरं कारण आलं समोर…
राऊत म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असाताना शरद पवार यांनी त्यांना जेवढी मदत केली तेवढी आताही होत नसेल पंतप्रधान असताना. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. त्याचा हा उत्तम नमुना आहे. दोन किंवा तीन वर्षांपूर्वी शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील योददान किती मोठं आहे हे स्वतः बारामतीत येऊन सांगणारे आणि शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत असं म्हणणारे मोदी आता म्हणतात शरद पवारांनी शेकऱ्यांसाठी काय केलं ?
मोदींच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
तुम्ही काय केलं या महाराष्ट्रात? सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या मोदींच्या काळात झाल्या. आपण काळे कायदे आणले हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं अपयश आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार होतात सिंगलही झाले नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जाऊन बोला योगी सरकारने नेमकं काय केलं. आसाम मध्ये जाऊन बोला तेथील मुख्यमंत्र्यांनी काय केलं. देशातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आहे अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
Supriya Sule : ‘मोदींच्या काळातच शरद पवारांना पद्मविभूषण’; सुळेंनीही सांगितली जुनी आठवण
मोदींच्या व्यासपीठावर भ्रष्टाचाऱ्यांची गर्दी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये एक तरुण नेता उपोषणाला बसला आहे. आपण शब्द देऊन देखील सरकारने तो पाळला नाही मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही जरांगे पाटलांना दिल्लीत घेऊन का आला नाहीत. पण यांच्या व्यासपीठावर एकजात भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि भ्रष्टाचारात बरबटलेले लोक बसले होते आणि हे भ्रष्टाचार नष्ट करायला निघालेत असा खोचक टोला राऊतांनी लगावला.