Bala Darade Warning If Rahul Gandhi Comes To Nashik : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय. कारण ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाच (Rahul Gandhi) धमकी दिली आहे. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. राहुल गांधी नाशिकमध्ये (Nashik) आल्यास तोंडाला काळे फासू. दगडफेक करु. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास धडा शिकवू, असं उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही, असं देखील बाळा दराडे यांनी (Maharashtra Politics) म्हटलंय. आम्ही स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो. त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी काही अपशब्द वापरले होते. त्याचा निषेध देखील बाळा दराडे यांनी व्यक्त केला आहे.
‘धनुषपेक्षा चांगला पर्याय नाहीच…’ ओम राऊत यांनी कलाम: द मिसाईल मॅन ऑफ इंडियामध्ये केलं कास्ट
बाळा दराडे यांनी म्हटलंय की, आमच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांच्या शैलीमध्ये राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं आहे. राहुल गांधी यांनी सावकरांबाबत अपशब्द वापरल्यास त्यांना आम्ही धडा शिकवू. आम्ही जरी महाविकास आघाडीत असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात असं बाळा दराडे यांनी म्हटलं आहे. जर त्यांच्या तोंडाला काळे फासायला नाही जमले तर आम्ही दगडफेक करू, असं दराडे यांनी म्हटलंय.
पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?
नाशिकमधील ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाली का? अशा चर्चा सुरू आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती असून नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे बाळा दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय.