मुंबई महापालिकेचा सातबारा आमच्या नावावर; मोर्चातून राऊत कडाडले

sanjay Raut On BJP and Shinde Camp :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मगाशी एक घोषणा ऐकली हा एक ट्रेलर आहे. आता खरा सिनेमा सुरु झाला आहे, असे म्हणत राऊतांनी राज्य […]

Letsupp Image   2023 07 01T173618.918

Letsupp Image 2023 07 01T173618.918

sanjay Raut On BJP and Shinde Camp :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मगाशी एक घोषणा ऐकली हा एक ट्रेलर आहे. आता खरा सिनेमा सुरु झाला आहे, असे म्हणत राऊतांनी राज्य सरकारला निशाणा साधला. यावेळी राऊतांचे भाषण सुरु असताना एक व्यक्ती गर्दीत हातात खोकं घेऊन उभा राहिला. यावर हे खोके सरकार असल्याची टीका राऊतांनी केली.

Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

राऊत पुढे म्हणाले की,  ही मुंबई शिवसेनेची आहे. ही मुंबई शिवसेनेच्या बापाची आहे. गेली 40 वर्षे या महापालिकेवर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा फडकवत ठेवला. हा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्राचे 40 खोके कारस्थानं करत आहे. ती उधळण्यासाठी हा मोर्चा आहे. या महाराष्ट्रावर या मुंबईवर शिवसेनेच राज्या राहिल हे सांगणारा हा मोर्चा असणार आहे. मोदी, शाह, फडणवीस यांची अशी इच्छा आहे, की भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभिमानाने भ्रष्टाचार करा, असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या परस्पर हकालपट्टी अन् प्रचंड गदारोळ; अमित शाहंच्या फोननंतर राज्यपालांची माघार

आज अत्यंत बेधडकपणे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर इथे जमलेले आहे. भाजपने या मोर्चावर चोर मचाए शोर अशी टीका केली होती. त्यावर राऊत म्हणाले की, आता निवडणुका घ्या मग कळेल चोर कोण आहे आणि या मुंबईत शोर कुणाचा आहे. यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे एखादी यंत्रणा असेल तर त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने हा मोर्चा पहा, मग तुमची डोळ्याच बुबळं बाहेर येतील.

तसेच या मुंबईचं रक्षण करण्याची हिंमत फक्त शिवसेनेमध्ये आहे. निवडणुका कधी घ्या, आज शनिवार असल्याने मुंबई महापालिकेचे कार्यालय बंद असेल पण नक्कीच बिळातून काही उंदीर आपल्याकडे पाहत असतील की हा मोर्चा किती भव्य आहे. या महानगरपालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर असून तो कुणालाही पुसता येणार नाही, असे म्हणत राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Exit mobile version