“जनेतची सेवा करायला सत्तेत गेलो म्हणणं हे ढोंग”, राऊतांचा अजितदादांवर टीकेचा बाण

अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.

Ajit Pawar On Sanjay Raut

Ajit Pawar On Sanjay Raut

Sanjay Raut Criticized Ajit Pawar : अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील. जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे सरकारवर जोरदार टीका केली.

राऊत पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगळे पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशा करता मत व्यक्त करायचं? अजित पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे स्थान आहे. त्याला छेद देणारी भूमिका आंदोलन कशा करता करायचं, आम्ही जर आंदोलन केली नाही विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील. राज्य देश लुटतील, महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यावर डाके टाकतील, जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही.

शरद पवार यांनी हा जो पक्ष उभा केला आहे तो आंदोलनातून उभा केला आहे. शिवसेनेसारखा पक्ष एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी आंदोलनं आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते. तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका. सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती. पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायला वापरली जात आहे. हे अजित पवार यांच्या इतका दुसरा कोणी भाष्य करू शकणार नाही.

गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात असा एकही विभाग नाही तिथे लुटमार केली नाही. सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले? हे तुम्ही नरेंद्र मोदी यांना जाऊन विचारा. मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळात प्रचंड लूटमार केली आणि त्यांच्या चौकशी सुरू झाल्यावर ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे. सत्तेत यासाठी गेले त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायचा होत्या म्हणून ते सत्तेत गेले. बाकी जनतेची सेवा महाराष्ट्रातील सेवा वगैरे वगैरे हे सगळे ढोंग आहे.

महापालिका निवडणुकीत युती होणार का? अजितदादांचा मेसेज अन् कार्यकर्त्यांत उत्साह

नरेंद्र मोदींना एवढाच आदर असता तर..

प्रकृतीची चौकशी करणे याला स्नेह किंवा आदर असं काही म्हणत नाही तो एक शिष्टाचार आहे. शरद पवार यांच्याविषयी एवढाच आदर आणि शिष्टाचार असता तर त्यांचा पक्ष अशा पद्धतीने फोडला नसता. त्यांचं घर फोडलं नसतं. नरेंद्र मोदी, अमित शाह जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं देखावा असतो आणि पब्लिसिटी स्टँड असतं. पवार यांची तब्येत उत्तम आहे आणि पवार यांची तब्येत काय आहे कशी आहे हे प्रधानमंत्री यांना माहीत असायला पाहिजे.

पण मी चौकशी केली मी किती भावनाशील माणूस आहे मला किती आजार आहे एखाद्या व्यक्तीविषयी जसं शिवसेनाप्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला पण अधूनमधून भाषणांमध्ये शिवसेनाप्रमुखांचा गुणगान करून मी कसा शिवसेनाप्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं. ढोंग आणि खोटारडेपणा याचा जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदी यांना द्यावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

Exit mobile version