सध्या बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना चाकण – नाशिक महामार्गावर घडली आहे. चाकण – नाशिक महामार्गावर असणाऱ्या चाकण येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही बस नाशिकहून पुण्याला जाताना ही आगीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. (shivshahi-bus-catches-fire-on-pune-nashik-highway)
पुणे – नाशिक महाममार्गावर शिवशाहीबसला आग…#Nashik #pune #shivshahi pic.twitter.com/BvOypm4T4y
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 17, 2023
आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले तर वाहतूकही विस्कळीत झाली. नाशिक वरुन पुण्याला जाताना चाकणमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात घटना घडल्याने परिसरात गर्दी जमा झाली.
महाराष्ट्रात असं आधी कधीच घडलं नाही, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या आगीमुळे बस पूर्णपणे जाळून खाक झाली.या घटनेमुळे नाशिक – पुणे माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना चाकणमध्ये भर रस्त्यावर शिवशाही बसच्या मागच्या टायरला आग लागली. यानंतर आग काही क्षणात बसमध्ये शिरली. यावेळी बसमधील प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने खाली उतरविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीसह धुराचे लोट वाढल्याने शिवशाही बसच्या मागच्या बाजूला बसने पेट घेतला..