Cabinet Expansion : अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची आहेत, याबाबतची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये आता महिला बाल कल्याण मंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढांना झटका बसला आहे. कारण लोढांकडे असलेलं महिला बाल कल्याण हे खात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. ( Shocked to Mangalprabhat Lodha women and Child welfare department goes to Aditi Tatkare in Maharashtra Cabinet Expansion )
‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार
त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा यांच्याकडील महिला बाल कल्याण हे खातं काढून घेतल्यानंतर आता त्यांना कोशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता हे खात देण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ठेवण्यात आले आहेत.
खलिस्तानी समर्थकांकडून सिडनीत भारतीय विद्यार्थ्याला लक्ष्य; लोखंडी रॉडने केली मारहाण
कोणतं खातं कोणाकडे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.
उपमुख्यमंत्री अजित पवार – वित्त व नियोजन.
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार.
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.
चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.
विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास.
गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.
दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण.
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.
सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार.
संदीपान आसाराम भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन.
उदय रवींद्र सामंत –उद्योग.
प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.
दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा.
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.
शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.
कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता.
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.