Shrirampur News : हॉटेल व्यवसायिकाचा किरकोळ कारणावरून शनिवारी भर दुपारी निर्गुण हत्या झाल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहर गेल्या चार दिवसापासून व्यापारी तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींनी शहरांमध्ये बंद पाळला आहे या हत्याकांडातील आरोपींवरती मकोका लावण्यात यावा अशी मागणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केलेले आहे संघटित गुन्हेगारी टोळींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास हॉटेल व्यवसायिक आकाश दुबईया यांचा तिघा जणांनी निर्गुण हत्या केली त्यामुळे श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कडकडीत बंद पाळण्यात येतोय सर्व नागरिक असतील आणि व्यावसायिक असतील हे या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आज या ठिकाणी महामोर्चाचा आयोजन श्रीरामपूरकरांच्या (Shrirampur) वतीने करण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने नागरिक आणि व्यावसायिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरातली गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. श्रीरामपूरकर महामोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावरती, प्रशासकीय कार्यालयांवरती जाणार आहेत. त्यामुळे आजच्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. एकंदरीत जर बघितलं तर आता श्रीरामपूरातील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या टोळी युद्धांना पायबंद कसा घातला जातो हे बघणं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ठरणार आहे.
…. तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांच्या आमदारांचा वरिष्ठ नेत्यांना इशारा –
काँग्रेसच्या आमदाराला अतिरिके चालतात…
बंटी जागीरदार हा आमदाराचा भाऊ आहे अशा शब्दात सागर बेग यांनी आमदार हेमंत ओगले यांच्या वरती टीका केली. जहागीरदार यांनी करण ससाने यांना सपोर्ट केला. यांना अतिरेकी चालतात मात्र कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल आणि त्यांना कायम गुंड वाटतो. माझ्यावर कुठल्याही गुन्हा दाखल झाला नाही जे गुन्हे दाखल झाले ते माझे भाषणांमधून झाले आहे असं मत बेग यांनी व्यक्त केलं.
