अहिल्यानगरमध्ये मोठी घडामोड! कर्जतमध्ये राम शिंदे-रोहित पवार एकत्र; भाजपच्या छाया शेलार बिनविरोध नगराध्यक्ष
Ahilyanagar Ram Shinde and Rohit Pawar भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं
Ahilyanagar Ram Shinde and Rohit Pawar together in Karjat BJP’s Chhaya Shelar elected unopposed Municipal Council President : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपच्या छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सत्ता स्थापन झाली आहे.
BSNLने लाँच केला Iphone पेक्षाही महागडा फोन; खरेदीपूर्वी घ्यावी लागणार DoT ची परमिशन
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छायाताई शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नऊ नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या चार नगरसेवकांनीही शेलार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. कर्जतमध्ये गेल्या काही दिवसांपासून विकासकामे रखडल्याची भावना नागरिकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर विकासाला गती देण्यासाठी सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी एकत्र येत सहकार्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
‘एल निनो’चा प्रभाव असतानाही देशभरात जोरदार पाऊस; काय आहेत कारण? अन् कुठं कुठं झाला पाऊस?
काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीदरम्यान विविध पक्षांतील नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात स्थानिक पातळीवर समन्वय झाल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यातून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्याबाबतही राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत.
मात्र, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी अशा दाव्यांना फारसे महत्त्व दिले नाही. त्यांनी सांगितले की, कर्जत नगरपंचायतीतील निर्णय हा स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या परिस्थितीनुसार घेतला आहे आणि त्यात त्यांनी कोणताही थेट हस्तक्षेप केलेला नाही.
IND vs ENG: बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, ‘या’ तीन खेळाडूंची होणार भारतीय संघातून हकालपट्टी ?
रोहित पवार म्हणाले, “कर्जत नगरपंचायतीतील घडामोडींवर माझे विशेष लक्ष नव्हते. स्थानिक नगरसेवकांनी एकत्रितपणे जो निर्णय योग्य वाटला तो घेतला. नगराध्यक्षपदी निवड झालेल्या छाया शेलार या भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या निर्णयाकडे स्थानिक पातळीवरील राजकारण म्हणूनच पाहिले पाहिजे.”
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीशी कथित संपर्क, ATS ची राज्यात एकाचवेळी छापेमारी, दीडशेहून अधिक जणांची चौकशी
नगराध्यक्ष निवडीनंतर कर्जतमधील बदललेल्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असली, तरी भविष्यात या घडामोडींचा स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.