Download App

हेलिपॅडवर बॅग तपासणीचा उद्धव ठाकरेंना वेगळाच अनुभव; म्हणाले, माझी किंमत कमी झाली काय?

उद्धव ठाकरे सिल्लोडमधील प्रचारसबेत बोलतना म्हणाले, बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळात लढा लढला. मात्र, आताही काही वेगळी परिस्थिती नाही

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या बॅग तपासणीच्यावरुन टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सिल्लोडमधील सभेला आले असता हेलिपॅड वर त्यांच्या बॅगांची तपासणी झाली नाही, (Uddhav Thackeray) यावरुन ठाकरे म्हणाले की, आज आल्यावर चुकल्या सारखं वाटलं हेलिकॅप्टरमधून उतरताना बॅग तपासायलाच कोण आलं नाही, आपली बॅग तपासत नाही म्हणजे आपलं महत्व कमी झालं की काय? असं मला वाटलं अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे.

इतकीच हौस असेल तर एकदा..; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

उद्धव ठाकरे सिल्लोडमधील प्रचारसबेत बोलतना म्हणाले, बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळात लढा लढला. मात्र, आताही काही वेगळी परिस्थिती नाही सगळ्या यंत्रणा ज्यांच्याकडे आहेत ते अन्याय करत आहेत. आपण एकजूट दाखवली आहे. अब्दुल सत्तार यांचा उल्लेख गद्दार असा करत उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडला लागलेला हा कलंक दूर करायचा आहे. याची मस्ती किती काळ सहन करणार. याला मंत्रीपद दिलं पण हे इतके हावरट नुसते खातात असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

तिसऱ्यांदा बॅग तपासली 

उद्धव ठाकरे हे यवतमाळ येथे प्रचार सभेला जात असताना वणीतील हेलीपॅडवरती हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली होती. यावेळी माझी एकट्याचीच बॅग न चेक करता सर्वांच्याच बॅगा तपासा, न्याय सगळ्यांना सारखा असतो, असं म्हणत उद्धव ठाकरे हे निवडणूक अधिकाऱ्यांवर चांगलेत संतापले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वत: व्हिडीओ शूट केला होता.

त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे तिसऱ्यांदा बॅग तपासण्यात आली होती. यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ शूट करत निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी केली. तुमचं नाव काय? कुठून आलात? कधीपासून काम करताय? अशी चौकशी केलीय. तसेच याआधी कुणा-कुणाच्या बॅगांची तपासणी केली आहे का? असे सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले होते.

follow us