Chhatrapati Shivaji Maharaj statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapti Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक शिवप्रेमींसह संघटना अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी (Shivaji Maharaj) तत्काळ कारवाईची मागणी केली. यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घडामोडी घडत असतानात पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या तरुणाला फक्त दीड ते दोन फूट पुतळे साकारण्याचा अनुभव होता. त्याने स्वतःच एका मुलाखतीत दिली होती. आता या गोष्टीची सरकारला माहिती नव्हती का? इतका कमी अनुभव असलेल्या तरुणाला काम दिलंच कसं? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
जयदीप आपटेने काही दिवसांपूर्वी सनातन प्रभात या दैनिकाला एक मुलाखत दिली होती. त्याने या मुलाखतीत म्हटलं होतं की या कामासंबंधी ज्यावेळी मला पहिल्यांदा समजलं तेव्हा मनात विचार आला की संधी मोठी आहे. जर व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल. पण जरा जरी चूक घडली तर सगळंच संपेल असेही वाटले. पण जे काही व्हायचं ते होईल पण हातातली संधी जाऊ द्यायची नाही.
या कामाच्या आधी मला आणखी तीन ते चार शिल्पे उभारण्याचे काम मिळाले होते. पण ही शिल्पे फक्त दीड ते दोन फुटांचीच होती. तरी देखील ही कामे करताना अभ्यास होत होता. यात मला जून महिन्यात विचारणा झाली की एखादा पुतळा उभारणार का? भारतीय नौदला बरोबर काम आणि पुतळाही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात उभारला जाणार होता. त्यामुळे काम करायचे मी ठरवले. सुरुवातीला एका आठवड्याच्या काळात लहान नमुने तयार केले. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सूचना होत्या त्यानुसार दोन नमुने बनवले होते. तिसरे शिल्प मात्र अचानक घडलेले होते आणि नेमके हेच शिल्प निवडण्यात आले, असे जयदीप आपटे या मुलाखतीत म्हणाला होता.
Chhava: छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है.. विकीच्या ‘छावा’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हा या कंपनीचा मालक, तर चेतन पाटील सल्लागार आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.