मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर अनेक शिवप्रेमींसह संघटना अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी (Shivaji Maharaj) तत्काळ कारवाईची मागणी केली. त्यानंतर काही प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा हालल्याचं पाहायला मिळालं आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवताना हलगर्जीपणा; दुर्घटनेनंतर समोर आली धक्कादायक माहिती

या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे गतवर्षी साजऱ्या झालेल्या नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Sindhudurga : छ. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला; PM मोदींच्या हस्ते वर्षभरापूर्वीच झालेले अनावरण

हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसंच, दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube