धक्कादायक! ‘पतीने इंजेक्शन देऊन साखळदंडाने बांधलं’, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडली महिला

धक्कादायक! ‘पतीने इंजेक्शन देऊन साखळदंडाने बांधलं’, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडली महिला

Sindhudurg Crime :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात एक महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडली. ही अमेरिकन महिला नागरिक असल्याचं समोर आलं आहे. ललिता कायी कुमार एस अस तिचं नाव असून तिला उपचारांसाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

‘इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

दरम्यान, आपल्या पतीनेच जंगलात बांधून ठेवलं असून गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या अवस्थेत होतो असा दावा त्या महिलेने केला आहे. अद्याप नीट बोलता येत नसल्याने त्या महिलेने कागदावर लिहून हा दावा केला आहे. तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल आणि टॅबमधील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेक्षणची दोन पोलीस पथके गोवा आणि तर सिंधुदुर्ग पोलिसांचं पथक तामिळनाडू येथे रवाना करण्यात आली आहेत. तर याप्रकरणी महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या मडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असून त्यात ती कुठेही आढळून न आल्याने प्रकरणात अजून संदिग्धता वाढली आहे. जर तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमकं कुठून आणले याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

शनिवारी दुपारी तामिळनाडू येथील व मुळ अमेरिका येथील महिला रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले 70 दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसंच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली. अन्न न मिळाल्याने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. त्यामुळे तिला तत्काळ अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

VIDEO : भीषण! एकाच रात्रीत दोनदा भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्याखाली शंभरहून अधिक लोक अडकले

जंगलात सापडून आलेली अमेरिकन महिला ही उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बेली डान्सर आणि योग शिक्षक होती. मात्र, ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचं आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे. पोलीस अधिकारी मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता ते ही माध्यमांना बाईट देण्यास नकार देत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube