सावंतवाडीची पोरं म्हणाली, ‘आ गऐ गद्दार…’ शरद पवारांनी सांगितला शिंदे सरकारचा ‘तो’ किस्सा

सावंतवाडीची पोरं म्हणाली, ‘आ गऐ गद्दार…’ शरद पवारांनी सांगितला शिंदे सरकारचा ‘तो’ किस्सा

Sharad Pawar criticizes Shinde-Fadnavis government : विद्यमान शिंदे सरकारबद्दल जनतेच्या मनात रोष असल्याचे सांगताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावंतवाडीच्या शाळेतील प्रसंग सांगितला. सांगोल्यात कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारची जनतेच्या मनात इमेज कशी आहे? हे सांगितले.

शरद पवार म्हणाले की, गेल्या आठवड्यामध्ये माझे सावंतवाडीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणारे एक निवृत्त मित्र सावंतवाडीला गेले व परत आले. मी त्यांना सहज विचारले की कोकणात काय परिस्थिती आहे. सरकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये काय भावना आहे?

त्यांनी सांगितेल की सावंतवाडीमध्ये गेल्यानंतर रस्त्याने फिरायला जायलो निघालो आणि तेव्हा रस्त्यावरुन तिरंगा लावलेली सरकारी गाडी गेली तर शाळेतील मुलं ‘आ गए गद्दार, खोकेवाले आ गए’ असं म्हणायला लागली. लहान मुलांच्या तोंडात सुद्धा खोके आणि खोकेवाले हा शब्द बसलेला आहे.

40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच

शरद पवार यांनी हा किस्सा सांगताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावर पवार म्हणाले की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. काही लोक फुटले व बाजूला गेले. कशासाठी गेले, काय पदरात पडले हे त्यांचे त्यांना माहीत. पण तो त्यांचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडलेला नाही. एकनाथ शिंदे यांचे सरकार झाले पण त्या शिंदेंच्या सरकारला समाजाचा पाठिंबा कितपत आहे याचा विचार आपल्याला करण्याची वेळ आली आहे.

सामना हे वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचं पॅम्प्लेट…मुनगंटीवारांचा खोचक टोला

येत्या काळात ज्या काही निवडणुका येतील त्या वेळी महाविकास आघाडीच्या पाठीशी अशी शक्ती उभी करा आणि महाराष्ट्राचे राजकारण व देशाचे राजकारण योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे अवाहन शरद पवार यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube