Chhava: ‘छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और…’; विकीच्या ‘छावा’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Chhava: ‘छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और…’; विकीच्या ‘छावा’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Chhaava Teaser And Release Date: ‘बॅड न्यूज’ने (Bad News) खळबळ माजवल्यानंतर, विकी कौशल (Vicky Kaushal) आता त्याच्या पुढील चित्रपट ‘छावा’साठी सज्ज (Chhaava Teaser ) झाला आहे. त्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून काही वेळापूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. दिनेश विजन दिग्दर्शित या पीरियड ड्रामामध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना विकी कौशलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’अनबोल्ड, अटूट, अजिंक्य, साम्राज्याला आव्हान देण्याचे धैर्य.’

कसा आहे टीझर?

छावा चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे, हा चित्रपट मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित आहे.

‘छावा’ची स्टारकास्ट

छावामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारणार असून दिव्या दत्ता सोयराबाईची भूमिका साकारणार आहे. याशिवाय रश्मिका मंदान्ना आणि नील भूपालम हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकीचा जबरदस्त लूक; ‘छावा’ची प्रचंड चर्चा

या सिनेमाने जागतिक स्तरावर रिलीजच्या अगोदरच एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर या मराठी सिनेमाचे पोस्टर झळकले आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला जाणार आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने सोशल मीडियावरुन ही गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे…”

‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बघायला मिळणार आहेत. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास आपल्याला सिनेमात बघायला मिळणार आहे. सिनेमा आगामी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube