Download App

… तर मी बीड जिल्ह्याचे पालकत्व घेईन, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाबाबत महत्वाचे विधान केले आहे. फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना आपल्याला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवं आहे याबाबत भाष्य केले आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालकमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला जर बीडला पाठवलं तर मी जाईल मात्र मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नाही पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन असं माध्यामांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी आतापर्यंत फरार आहे. पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. दुसरीकडे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिकी कराडचे नाव मुख्य आरोपी म्हणून घेण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.

जबरदस्तच, ‘ह्या’ 7 इलेक्ट्रिक कार्सवर तब्बल 3 लाखांचा डिस्काउंट, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत

तर दुसरीकडे जर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर मला बीडला पाठवलं तर मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेईल असं म्हटल्याने आता बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us