Download App

नर्तकीचा नाद भोवला! सासुरे गावात प्रेमसंबंधातून माजी उपसरपंचाने गोळी झाडून स्वत: ला संपवलं?

Solapur जिल्ह्यातील सासुरे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Written By: Last Updated:

Solapur Youngsters Suspecious death shoot himself by gun Murder suspected to broken relationship  : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, मृत युवकाचे नाव गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८, रा. दैठन, ता. गेवराई, जि. बीड) असे आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोविंद बरगे हे प्लॉटिंग व्यवसाय करत होते. व्यवसाय चांगला सुरू असतानाच त्यांची ओळख पारगाव येथील थिएटरमध्ये काम करणाऱ्या नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर जवळीक व प्रेमसंबंधात झाले. या काळात बरगे यांनी पूजा हिला सोन्याची नाणी व सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला होता.

गोविंद बरगे मृतावस्थेत, शेजारीच पिस्तूल देखील

मात्र अलीकडे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याचा समेट घडवण्यासाठी गोविंद बरगे सोमवारी मध्यरात्री आपल्या चार चाकी वाहनातून सासुरे येथे मुलीच्या घरी आले होते. सकाळी गावकऱ्यांनी घरासमोर गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली. वैराग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, गाडीत गोविंद बरगे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शेजारीच पिस्तूल देखील मिळाले.

ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास मी देखील उत्सुक; ट्रम्प यांच्या वक्तव्याला मोदींचा सकारात्मक प्रतिसाद

प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तथापि, घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळल्याने हा खून आहे की आत्महत्या, याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर तसेच वैराग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वच्छ वायू सर्व्हेक्षणात देशात अमरावतीची बाजी; पुणेकरांचा श्वास मोकळा 23 हून दहाव्या क्रमांकावर

मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी तसेच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्राम पोलिस पाटील यांनी सकाळी सुमारास वरा पोलिसांना माहिती दिली की, गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी आहे. कार पूर्णपणे लॉक असून, आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले.

मोदी माझे सर्वात चांगले मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; टॅरिफ वॉर थांबणार?

त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे (रा. मसला, ता. गेवराई, जि. बीड) अशी पटली. चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता.

प्रेमसंबंध तुटल्याने वादातून हत्या झाल्याचा संशय

नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या.गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे.

कही खुशी कही गम! मेष ते मीन सर्वच राशींसाठी कसा आहे? आजचा दिवस जाणून घ्या…

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. डीवायएसपी सायकर म्हणाले, “प्रेमसंबंधातील वादामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे; मात्र आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.” सध्या कोणालाही अटक झालेली नाही. बार्शी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

follow us