स्वच्छ वायू सर्व्हेक्षणात देशात अमरावतीची बाजी; पुणेकरांचा श्वास मोकळा 23 हून दहाव्या क्रमांकावर

Clean Air Survey मध्ये अमरावतीने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे. तर पुण्याने हवा गुणवत्ता यादीमध्ये देशामध्ये 23 हून 10 वं स्थान गाठलं आहे.

Clean Air Survey

Clean Air Survey Amravati city cleanest air Pune City Air quality Improved on 10th from 23rd in Country: देशामध्ये पार पडलेल्या स्वच्छ वायू सर्व्हेक्षणामध्ये महाराष्ट्रातील अमरावती या शहराने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे. तर गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाच्या छायेखाली असलेल्या पुणे शहरासाठी आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता पुणेकर न काळजी करता मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. कारण पुणे शहरातील हवा गुणवत्ता सुधारली आहे. या शहराने हवा गुणवत्ता यादीमध्ये देशामध्ये 23 हून 10 वं स्थान गाठलं आहे.

हवा गुणवत्ता सुधारली…

केंद्र सरकारने देशातील शहरांची हवा गुणवत्ता तपासण्यासाठी एक सर्व्हेक्षण केलं. त्यामध्ये त्यांनी देशातील सर्वांत स्वच्छ हवा असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे शहराने बाजी मारली आहे. कारण गेल्या वेळी हवा गुणवत्तेच्या बाबतीत 23 व्या स्थानावर असलेलं पुणे शहर आता 10 क्रमांकावर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचं समजत आहे. त्यामुळे आता पुणेकर निश्चिंतपणे मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर प्रदुषणाचे होणारे दुष्परिणाम देखील यामुळे काहीसे कमी होण्यास मदत होणार आहे.

https://swachhbharatmission.ddws.gov.in/SSG-2025

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रातील अमरावती या शहराने देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे या स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2025 मध्ये महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या स्पर्धेमध्ये अमरावतीने 3 ते 10 लोकसंख्येच्या गटामध्ये अमरावतीने देशात सर्वात स्वच्छ हवा असलेलं शहर होण्याचा मान पटकावला आहे.

मोदी माझे सर्वात चांगले मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; टॅरिफ वॉर थांबणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube