मोदी माझे सर्वात चांगले मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; टॅरिफ वॉर थांबणार?
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले.

US Tariff war will stop Donald Trump looking for to speaking with good friend PM Modi : टॅरिफच्या (US Tariff) मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत. या दरम्यान मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतच ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
मला ही गोष्ट जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यातील व्यापारी संबंध (US Tariff) आणि वाटाघाटी यात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मी माझे सर्वात चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या आठवड्यात संवाद साधणार आहे. मला आशा आहे की, या चर्चेनंतर दोन्हीही राष्ट्रांमध्ये संबंध सुधारतील. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ही चर्चा यशस्वी होईल.
कही खुशी कही गम! मेष ते मीन सर्वच राशींसाठी कसा आहे? आजचा दिवस जाणून घ्या…
ट्रम्प यांना मोदींचा प्रतिसाद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानंतर गेल्या वेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या भावना आणि विपक्षीय संबंध सकारात्मक करण्याच्या त्यांच्या पुढाकाराला पाठिंबा देत आहे, भारताने अमेरिका यांच्यातील सुधारलेले संबंध जगासाठी सकारात्मक परिणाम करणारे ठरतील असं म्हटलं. मी ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे.
https://x.com/narendramodi/status/1965597878237139351
https://truthsocial.com/@realDonaldTrump/115176472700835865
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धक्के देणारे निर्णय घेतले जात आहेत. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एससीओ समिटमध्ये चीन, भारत आणि रशिया या तीन देशांची चांगली केमिस्ट्री दिसली. अमेरिकेच्या दादागिरीसाठी हा मेसेज होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे भारताने मात्र अमेरिकेकडून कच्चे तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nepal Protest : नेपाळमध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडली; संरक्षक भिंत तोडून 1472 कैद्यांचं पलायन…