Nepal Protest : नेपाळमध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडली; संरक्षक भिंत तोडून 1472 कैद्यांचं पलायन…

नेपाळमध्ये आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून 1472 कैद्यांनी जेलची संरक्षक भिंत तोडून पलायन केल्याचं समोर आलंय.

Untitle (56)

Nepal Protest : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आक्रोश (Nepal Protest) केलायं. देशभरातील युवकांनी एकाच व्यासपीठावर येत जनआंदोलन उभं केलंय. त्याचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. नेपाळमध्ये अचानकपणे अराजकता माजल्याने या आंदोलनादरम्यान, एकूण 1432 कैद्यांना पळून जाण्यात यश आलंय. जेलची संरक्षक भिंत तोडून या कैद्यांनी जेलमधून पलायन केलंय. कांतिपूर या वृत्तसंस्थेने हे वृत्त आपल्या एक्स हॅंडलवर दिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, महोतारी इथल्या जलेश्वर जेलची संरक्षक भिंत तोडून 572 कैदी पळून गेले आहेत. नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा फायदा या कैद्यांनी घेतलायं. महोत्तरीचे पोलिस अधीक्षक हेरम्बा शर्मा यांनी सांगितलं की, 500 पेक्षा अधिक आंदोलनकर्ते आणि जेलमधील कैद्यांनी मिळून संरक्षक भिंत तोडलीयं. भिंत तोडल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने 86 कैदी सोलुखुम्बू जेलमधून पळून गेले आहेत.

स्कूल ड्रॉप आऊट अन् हत्येच्या आरोपात तुरुंगवारी; PM पदाचा राजीनामा दिलेले ओली कोण?

तसेच तुलसीपूर जेलमधून 124 पळून गेले आहेत. एका ब्लॉकमध्ये 179 कैदी असून 124 पळून गेले आहेत. अद्यापही 55 कैदी जेलमध्ये असून कैलालीच्या जेलमधून 650 कैद्यांनी पलायन केलंय. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून नेपाळमध्ये तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आंदोलकर्त्यांनी सरकारी इमारतींना टार्गेट केलं असून पंतप्रधान कार्यालय, संसद, सर्वोच्च न्यायालय, विशेष न्यायालय, महान्यायवादी कार्यालय, यासोबतच राजकीय नेत्यांच्या घरांनाही आंदोलकांकडून टार्गेट करण्यात आलं आहे.

नेपाळची कमान सैन्याच्या हाती….
रात्री दहा वाजल्यापासून देशाची कमान सैन्याने आपल्या हाती घेतली आहे. नेपाळचे सैन्यप्रमुख अशोक राज सिगडेल यांनी सांगितले की नेपाळच्या इतिहासापासूनच सैन्य कठीण परिस्थितीत देशाची अखंडता, स्वतंत्रता, राष्ट्रीय एकता आणि नेपाळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. नेपाळमध्ये आता जे आंदोलन सुरू आहे. यात जे काही नुकसान झालं आहे त्याचं आम्हाला अतीव दुःख आहे. रात्री दहा वाजल्यापासून देशात सैन्य शासन लागू होईल असे सिगडेल यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube