मोठी बातमी! आता नेपाळची सत्ता सैन्याच्या हाती; सेनाप्रमुखांनी आंदोलकांना केलं आवाहन
नेपाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. रात्री दहा वाजल्यापासून देशाची कमान सैन्याने आपल्या हाती घेतली आहे.

Nepal Protest : हिंसाचाराने जळत असलेल्या नेपाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. रात्री दहा वाजल्यापासून देशाची कमान सैन्याने आपल्या हाती घेतली आहे. नेपाळचे सैन्यप्रमुख अशोक राज सिगडेल यांनी सांगितले की नेपाळच्या इतिहासापासूनच सैन्य कठीण परिस्थितीत देशाची अखंडता, स्वतंत्रता, राष्ट्रीय एकता आणि नेपाळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. नेपाळमध्ये आता जे आंदोलन सुरू आहे. यात जे काही नुकसान झालं आहे त्याचं आम्हाला अतीव दुःख आहे. रात्री दहा वाजल्यापासून देशात सैन्य शासन लागू होईल असे सिगडेल यांनी सांगितले.
नेपाळमध्ये अजूनही धगधगती (Nepal Protest) स्थिती आहे. आंदोलक प्रचंड चिडलेले आहेत. नेते आणि मंत्र्यांनी देशाबाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केली आहे. तर दुसरीकडे परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी प्रयत्नही होत आहेत. देशातील अनेक वेबसाइट बंद केल्या आहेत. यात काठमांडू पोस्ट, कांतिपूर न्यूज अशा मोठ्या वेबसाइट्सचा समावेश आहे.
अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ.. चार वर्षांत भारताच्या 4 शेजाऱ्यांना आंदोलनाचा फटका
रवि लामिछाने, बालेन शाह, सेनाप्रमुख सिगदेल आणि आंदोलकांत सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुशीला कार्की या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत.
नेपाळमध्ये आता केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांची सत्ता संपुष्टात आली आहे. आता देशाची कमान सैन्याची हाती राहणार आहे. देशात सध्या सुरू असलेली संघर्षाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सैन्य देशातील सर्व सुरक्षा तंत्र आपल्या अधिकारात घेईल असे सिगदेल यांनी सांगितले होते. त्यानुसार देशात ठिकठिकाणी सैन्यातील जवान तैनात झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
Nepal Protest : नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?
आंदोलकांनी तीन जेल फोडले, कैदी फरार
आंदोलकांनी तीन मोठे जेल देखील फोडले. या तिन्ही कारागृहांतून जवळपास दोन हजारांहून अधिक कैदी फरार झाले आहेत. महोत्तरी येथील जलेश्वर कारागृहातून 572 कैदी फरार झाल्याची माहिती आहे. या कारागृहाची भिंत आंदोलकांनी तोडली. ललितपूर येथील नक्खू कारागृहातून आंदोलकांनी माजी उपपंतप्रधान रवि लामिछाने यांना मुक्त केले. यानंतर दीड हजार कैदीही बाहेर आले. येथील आणखी एक कैलाली या कारागृहातूनही कैदी फरार झाले.