भावी पंतप्रधान? कोण आहे इंजिनिअर आणि मग रॅपर झालेला Gen Z चा नेता बालेन शहा?

नेपाळमध्ये सुरू असलेल्या सामाजिक-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.

Balen Shah

Balen Shah Nepal : पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या सामाजिक-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा जोरात सुरू आहे. युवा वर्ग, मुख्य म्हणजे Gen Z त्यांना आपला नेता म्हणून पाहतो. त्यांच्या धोरणात्मक विचारांनी आणि प्रामाणिक नेतृत्वाने नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बालेन शाह हे नेपाळच्या (Balen Shah) काठमांडूचे महापौर आहेत. आधी इंजिनिअर आणि मग रॅपर झालेले बालेन तरुणांचे (Nepal Protest) लोकप्रिय नेते बनले आहेत. २०२२ मध्ये त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून काठमांडू महापौरपदासाठी निवडणूक लढवली आणि विजय मिळवून राजकीय वर्तुळात आपली वेगळी छाप सोडली आहे. बालेन शाह म्हणजे तरुणाईसाठी नवीन आशा असून ते त्यांच्या स्वच्छ प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे लोकप्रिय झाले आहेत.

अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ.., चार वर्षांत भारताच्या 4 शेजाऱ्यांना आंदोलनाचा फटका

बालेन शाह यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आहे. त्यांनी कर्नाटक येथील विस्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून (VTU) स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी (MTech) पूर्ण केली आहे.  राजकारणात येताच बालेन शाह यांनी तरुणांमध्ये खास लोकप्रियता मिळवली. सोशल मिडिया बंदीविरुद्ध सुरू झालेल्या Gen-Z आंदोलनात ते अग्रेसर नेता म्हणून समोर आले. त्यांनी आंदोलनाला स्पष्ट पाठिंबा दर्शवत, तरुणांना प्रेरणा दिली.

बालेन शाह यांनी काढलेल्या काही सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्यांवरही चर्चा झाली आहे. उदाहरणार्थ, २०२३ मध्ये त्यांनी भारतीय रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला आणि तो बदलण्याची मागणी केली. चित्रपट नेपाळमध्ये दाखवण्यास मनाई करणार असल्याचा इशाराही दिला होता.  बालेन शाह यांनी कधीकधी भारताच्या काही राजकीय धोरणांविरोधात स्पष्ट मत व्यक्त केले आहे, नेपाळची सांस्कृतिक ओळख जपण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे भारताशी त्यांचे संबंध फक्त शैक्षणिक नसून सांस्कृतिक व राजकीय संदर्भातही महत्त्वाचे झाले आहेत.

टाइम मासिकात ‘जगातील प्रभावशाली १०० व्यक्ती’ मध्ये बालेन शाह यांचे नाव होते. न्यूयॉर्क टाईम्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यांना युवा परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळख दिली. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते; त्यांची जीवनशैली, विचारसरणी आणि स्वच्छ प्रतिमा नेपाळी तरुणांना प्रेरणादायी वाटते.

Nepal Protest : नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube