Nepal Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं; घर पेटवून दिल्याचा आरोप…

नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांच्या घराला आंदोलकांनी आग लावली असून या आगीत झलनाथ यांची पत्नी राजलक्ष्मी यांचा मृत्यू झालायं.

Untitle (54)

Nepal Protest : नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी संसदेनंतर आता आपला मोर्चा माजी पंतप्रधान झलनाथ खनल (Zalnath Khanal) यांच्या घराकडे वळवलायं. आंदोलकांनी खनल यांचं घर पेटवून दिलं असून या दुर्घटनेत झलनाथ खनल यांची पत्नी राजलक्ष्मी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! राज्यात ‘या’ योजनेस थेट दोन वर्षांची मुदतवाढ; फायदाच फायदा..

ही घटना काठमांडूच्या दल्लू परिसरात घडली असून या भागात माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांचं घरं आहे. आंदोलकांनी घर पेटवून दिल्यानंतर घराला आग लागली. या आगीत राजलक्ष्मी गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यानंतर त्यांना किर्तिपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान,त्यांचा मृत्यू झालायं. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आंदोलकांनी त्यांच्याही घराला आग लावल्याचं पाहायला मिळालंय. सोशल मीडियावर बंदी आणल्याने आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह इतर राजकीय नेत्यांच्या घरांवरही हल्ला केला आहे.

अजितदादांनी महिला पोलिस अधिकाऱ्याला दम भरला? CM फडणवीसांनी मौन सोडलं…

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुणाईने केलेल्या आंदोलनामुळे नेपाळमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर बंदी आणि भॅष्टाचारांच्या आरोपांमुळे जवळपास सर्वच तरुण रस्त्यावर उतरले असून संसद भवनाबाहेर निदर्शने सुरु आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज या आंदोलकांनी नेपाळची संसद पेटवल्याची चित्र पाहायला मिळालंय. अशातच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि पंतप्रधान के.पी. ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलायं.

दरम्यान, सुंदान गुरुंगची ताकद म्हणजे युवक आहेत. त्यांचे आंदोलन पूर्णपणे डिजिटल टूल्सवर आधारित असून सोशल मीडियावरुन गुंदान आंदोलनाची दिशा ठरवतात. हातात पुस्तके आणि शाळेच्या कपड्यांवर युवकांनी आंदोलनाला रस्त्यावर उतरण्याबाबतचे आदेश सुंदान यांनी दिले आहेत. नेपाळमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून संसदेबाहेर जाळपोळच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube