अजितदादांनी महिला पोलिस अधिकाऱ्याला दम भरला? CM फडणवीसांनी मौन सोडलं…

महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केलेल्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

Untitle (49)

Cm Devendra Fadanvis On Dcm Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एका महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (Anjana Krushna) यांचा फोनवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अजित पवार महिला अधिकाऱ्याला दम देत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालत आपलं मौन सोडलंय. महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केलेल्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

मोठी बातमी! उरणमधील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आलीयं. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. काही वेळा समोरच्या बाजूला काय चाललंय याची आपल्याला काहीच कल्पना नसते. अनेकदा आमच्याकडे निवदने येत असतात, त्यावर आम्ही कारवाई करा असं लिहित असतो.परंतू प्रत्यक्षात वस्तूस्थिती वेगळी असते. अशावेळी अधिकारीच आम्हाला लक्षात आणून देत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटलय.

एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरुन विरोधकांनी टीकेचा भडीमार सुरु केल्यानंतर सरकारमधील कोणताही नेता असो, अधिकाऱ्यांचा सन्मान हा अबाधित राहायलाच हवा, असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस यांच्या या खंबीर भूमिकेनंतर अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

नगर-मनमाड रस्त्यावरून तनपुरे आक्रमक! अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आयपीएस अधिकारी अंजना कृ्ष्णा यांना दमदाटी केल्यानंतर सोशल मीडियासह विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीकेची बरसात केली जात आहे. अजितदादांना कार्यकर्त्यांने नव्हे तर एका मध्यस्थाच्या माध्यमातून फोन लावण्यात आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. दरम्यान, अजित पवार आणि अंजन कृ्ष्णा यांच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील एका गावातील व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच व्हीडिओमुळे विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका होत आहे. हे प्रकरण आहे माढा तालुक्यातील कुर्डू गावचं कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून “कारवाई थांबवा” असे आदेश दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube