ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास मी देखील उत्सुक; ट्रम्प यांच्या वक्तव्याला मोदींचा सकारात्मक प्रतिसाद
टॅरिफच्यावरून भारत-अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. या दरम्यान ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले. त्यावर मोदींनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.

US Tariff PM Modi Positive Replay after Donald Trump ask for discussions : टॅरिफच्या (US Tariff) मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत. या दरम्यान मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतच ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले मी देखील ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे.
ट्रम्प यांना मोदींचा सकारात्मक प्रतिसाद…
भारत आणि अमेरिका जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की, आमच्या व्यापारी वाटाघाटी आमच्या भागीदारीला अमर्यादीत क्षमता देतील. आमच्या टीम ही चर्चा, संवाद लवकरच करतील. मी देखील ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. आम्ही आमच्या लोकांसाठी उज्जल आणि समृद्ध भविष्य देण्यासाठी एकत्र काम करू. असं म्हणत ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
https://x.com/narendramodi/status/1965597878237139351
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
मला ही गोष्ट जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यातील व्यापारी संबंध आणि वाटाघाटी यात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मी माझे सर्वात चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या आठवड्यात संवाद साधणार आहे. मला आशा आहे की, या चर्चेनंतर दोन्हीही राष्ट्रांमध्ये संबंध सुधारतील. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ही चर्चा यशस्वी होईल.
स्वच्छ वायू सर्व्हेक्षणात देशात अमरावतीची बाजी; पुणेकरांचा श्वास मोकळा 23 हून दहाव्या क्रमांकावर