Download App

‘माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे…’, सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा साश्रू नयनांनी दावा

माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार कण्यात आलं. माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे प्राण घेतले

  • Written By: Last Updated:

Somnath Suryawanshi Mother : सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी परभणीत गेले होते. यावेळी पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची (Somnath Suryavanshi) हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या झाली, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. त्यानंतर सोमनाथ यांच्या आईनेही माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असं म्हटलं आहे.

अजितदादांनी भुजबळांना मंत्रिपद का दिलं नाही? CM फडणवीसांनी सांगूनच टाकलं.. 

राहुल गांधींनी दुपारी अडीच वाजता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडले आणि आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती राहुल गांधी यांनी घेतली.

दरम्यान, राहुल गाधींच्या भेटीनंतर सोमनाथ यांच्या आई की, माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार कण्यात आलं. माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे प्राण घेतले. माझा मुलगा मरण पावल्यानंतर मला पाच दिवसांनी सांगण्यात आले. मला काहीही सांगितलं नव्हतं. मुलगा जिवंत असताना पोलिसांनी मला फोन केला नाही. नंतर मला सांगण्यात आले की तुमचा मुलगा सोमनाथचा मृत्यू झाला आहे, त्याची बॉडी गेऊन जा. हे मला जे सांगितलं, तेच आम्ही राहुल गाधींना सांगितल्याचं त्या म्हणाल्या.

अजितदादांनी भुजबळांना मंत्रिपद का दिलं नाही? CM फडणवीसांनी सांगूनच टाकलं.. 

सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आत्तापर्यंत जे काही घडलं ते आम्ही राहुल गांधींना सांगितले. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे मुख्यमंत्री कसे म्हणू शकतात? असा सवालही राहुल गांधींना केला, असं सोमनाथ यांच्या आई म्हणाल्या.

राहुल गांधींचा आरोप काय?
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गंभीर मोठा आरोप केला. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हे स्पष्ट झालंय की, 100 टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात राजकारण नको, तर न्याय हवा, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा.

follow us