Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आता भाजपकडून आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये श्रीगोंदा येथे भाजपकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांनी महायुतीमधून बाहेर पडल्या आहेत. तसंच, आपल चिन्ह कोणत्या पक्षाचं राहील हे मला माहीत नाही. (Election) मात्र, आता वेळ आली तर अपक्षही निवडणूक लढवणार अशा शब्दात नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. सध्या स्थितीला श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या प्रतिभा पाचपुते विरुद्ध अनुराधा नागवडे असा सामना रंगणार हे मात्र नक्की. अजित पवारा गटामधून नागवडे गट आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्याने ऐन निवडणुकी पूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
महायुतीमधून उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि त्यांचे पती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या समर्थकांनी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करत पुढील दिशा स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुराधा नागवडे या निवडणूक लढवणारच असल्याची भूमिका त्यांनी घेतली. यासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी नागवडे परिवाराने केली आहे.
Marathwada Politics : पक्षाने तिकीट दिले तर ठीक अन्यथा बंडखोरी; मराठवाड्यातील प्रमुख लढती
महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेदवारीबाबत बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या, आम्ही महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, पक्षापुढे अडचण असल्याने आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा राजीनामा दिला आहे. नागवडे परिवारातील आमदार व्हावा ही कार्यकर्त्यांसह तालुक्यातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
विखे, कर्डिले, राम शिंदे, राजळेंना भाजपचे तिकीट; श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी
महाविकास आघाडीतील पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जातील. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे. राजेंद्र नागवडे यांनी आपली भूमिका जाहीर करत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली. पण, त्यांनी योग्य निर्णय घेऊ एवढेच आश्वासन दिलं आहे. आपण सर्व पदांचा राजीनामा देत आहोत. आता पक्ष चिन्ह कोणतंही असो निवडणूक लढवणारच असं सांगून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.