10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं
उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान सक्सेसफुल; पाकिस्तानला फोडला पुरता घाम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत निकाल लागेल, असं बोर्डाने म्हटले होते. विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत असून सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…; शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर रोहित पवारांची पोस्ट
यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसलेले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे शिक्षण मंडळ लवकरात लवकर निकाल जाहीर करणार असल्याचं दिसतंय.
आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलेलंआहे. दहावीचा निकाल लवकर लागल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ही परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.