Msrtc Workers Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या सणात आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना 22 हजार रुपयांची उचलही घेता येणार आहे. याबाबतची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दिवाळीआधी दलाल स्ट्रीटवर पैशांचा पाऊस! शेअर बाजारातील तेजीचे चार प्रमुख कारणे
मात्र, एकीकडे दिवाळी बोनस जाहीर झाला असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेने बेमुदत संपाची घोषणा केली आहे. येत्या शनिवारी हा संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन आणि सेवा सवलती लागू कराव्यात, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय 97 महिन्यांची 115 टक्के महागाई भत्ता थकबाकी, 60 टक्के दराने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी अदा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ऊसाच्या दराबाबत आठवडाभरात कारखानदारांनी अंतिम निर्णय करावा…मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सूचना!
कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपयांची दिवाळी भेट द्यावी, एसटी महामंडळाच्या जमिनींचा 98 वर्षांचा भाडेपट्टा, कंत्राटी भरती आणि भाडेतत्त्वावरील बसेसचे करार रद्द करावेत, असा आग्रह संघटनेने धरला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचे धोरण थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दिवाळीनंतर मागण्यांवर चर्चा होणार
एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. दिवाळीनंतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिवाळी बोनस जाहीर झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा कायम राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
