Devendra Fadnavis : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना होमगार्ड्सची अनेकदा मदत होते. सण उत्सवांचा काळ असो किंवा एखादा आपत्कालीन प्रसंग.. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते होमगार्ड्स. या होमगार्ड्सना आज एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे. होमगार्डसच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. विजयादशमी दिनी राज्यातील लाखो होमगार्ड्सची मागणी राज्य सरकारने मंजूर केली आहे.
समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं पोलिसांकडून चैतन्य महाराजांना कायद्याचा डोस
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे.
उपहार भत्ता 100 रुपयांवरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55 हजार होमगार्ड्सना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येत आहे. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा..
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे.
आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये… pic.twitter.com/iIUFmzskeI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2024