Devendra Fadnavis : मंडलिकसाठी फडणवीस मैदानात, चंदगडकरांना दिला मोठा शब्द

Devendra Fadnavis : मंडलिकसाठी फडणवीस मैदानात, चंदगडकरांना दिला मोठा शब्द

Devendra Fadnavis : राज्यात आता लोकसभेसाठी (Lok Sabha) महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार होताना दिसत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) कोल्हापूरमधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथील चंदगड येथे जाहीर सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्याचे आवाहन केला.

सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक ग्रामपंचायतची नसून पुढील पाच वर्ष या देशाचा नेतृत्व कोण करणार? कोण देशाला विकासाच्या मार्गावर नेणार हे निश्चित करण्याची ही निवडणूक आहे. देशात सध्या दोनच पर्याय आहे एक म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि दुसरा म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi).

राहुल गांधी यांच्यासबोत 26 पक्षाची खिचडी आहे तर मोदी यांच्यासोबत सर्वांना बसण्याची संधी आहे. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये प्रियंका आणि सोनिया गांधी यांच्यासाठी जागा आहे तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांच्यासाठी जागा असून उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे तर मोदी यांच्या इंजिनमध्ये तुमच्यासाठी जागा आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना मोदींनी गरिबीतून बाहेर काढले. जगात मोदी मॉडेलची चर्चा होत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चंदगडकरांना मोठा शब्द देत फडवणीस म्हणाले, लवकरच या भागात एमआयडीसी येणार आणि त्यामध्ये उद्योग धंदे देखील येणार असल्याचे आश्वासन दिले. तर कोरोना काळात नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना वॅक्सीन दिली. अनेकांचे जीव वाचवले. भारताने कोणाकडे कोरोना काळात वॅक्सीनसाठी भीक मागितली नाही. स्वतः निर्माण केली आणि इतर देशांना दिली असं फडणवीस म्हणाले.

ठाण्यात शिंदे गटाच्या अडचणीत वाढ, भाजप सोडणार साथ? बैठकीत ठरला मोठा प्लॅन

तर पाकिस्तानबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. फडणवीस म्हणाले 2014 पूर्वी पाकिस्तान भारतात बॉम्बस्फोट करत होता आणि भारत कोणतीही कारवाई करत नव्हता मात्र मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर पाकिस्तानने भारतात बॉम्बस्फोट केला नाही. यामुळे पुन्हा एकदा मोदींनी पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज