पुण्यात महायुतीला झटका! मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने नाना भानगिरे शिवसेनेला रामराम करणार…

पुण्यात महायुतीला झटका! मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने नाना भानगिरे शिवसेनेला रामराम करणार…

Nana Bhangire will leave Shivsena Due to CM Shinde not came home : एकीकडे महायुतीचा लोकसभेसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील एकनाथ शिंदे ( CM Shinde ) यांच्या शिवसेनेला आणि पर्यायाने महायुतीला पुण्यात मोठा झटका बसणार आहे. तो म्हणजे शिवसेनेचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते नाना भानगिरे ( Nana Bhangire ) शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने शिवसेनेला रामराम ( leave Shivsena ) करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गदर- ॲनिमलनंतर देओल कुटुंबात मोठा बदल? कपिलच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितल कारण

नेमकं प्रकरण काय?

नाना भानगिरे हे शिवसेनेचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेसाठी बुधवारी नसरापूर येथे आले होते. त्यामुळे नाना भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. तसेच भानगिरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण देखील देण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांकडून हे निमंत्रण टाळण्यात आलं.

शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा फोन, मला CM पदाची ऑफर; फडणवीसांचा गौप्यस्फोट

पुणे दौऱ्यावर असताना देखील मुख्यमंत्री नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी गेले नाहीत. तर ते जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या घरी गेले होते. त्यावरून आता नाना भानगिरे हे थेट शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या नाराजीला एवढे एकच कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून भानगिरे हे पक्षामध्ये वारंवार डावललं जात असल्याने, तसेच युवा सेना आणि युवती सेना या दोन्हींमधील अंतर्गत गटबाजीला वैतागले आहेत. त्यामुळेच नाना भानगरे यांच्यासह समर्थक पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज